Goa News : विद्यार्थी, पालकांनो सावधान,भूलथापांना बळी पडू नका! मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Goa News : साखळीत गुणवंतांचा गौरव पण तरीही गोमंतकीय विद्यार्थ्यांनी पालकांनी या संस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
pramod sawant
pramod sawantDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News :

साखळी, राज्यात सध्या मुलांना नोकरीचे आमिष दाखवून शिक्षणासाठी भरमसाठ पैसे उकळण्यासाठी काही अनधिकृत शिक्षण संस्था सरसावल्या आहेत. अशा शिक्षण संस्थांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

पण तरीही गोमंतकीय विद्यार्थ्यांनी पालकांनी या संस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

पद्मिनी फाऊंडेशनतर्फे साखळी रवींद्र भवन सभागृहात साखळी मतदारसंघातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री बोलत होते.

दहावी व बारावी उत्तीर्ण होणारे अनेक विद्यार्थी कोणते क्षेत्र निवडावे याबाबत अनभिज्ञ असतात. शिक्षकांनी ही जबाबदारी घेऊन स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याचे भविष्य घडावे यासाठी रस घ्यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी जि.पं. सदस्य गोपाळ सुर्लकर, नगराध्यक्षा रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, फाऊंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग कुट्टीकर, संतोष मळीक, संजय नाईक,कालिदास गावस, शर्मिला मडकईकर, मैथिली परब, डॉ. लक्ष्मी परब, कल्याण सावंत, डॉ. ज्योती सावंत यांची उपस्थिती होती.

अनधिकृत संस्थांवर कारवाई करणारच!

राज्य तसेच केंद्र सरकारशी संलग्न नसलेल्या शिक्षण संस्था मुलांना सिव्हिल एव्हिएशनमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे दीड लाखांचे शिक्षण शुल्क आकारत आहेत. आपल्याकडे अशीच एक विद्यार्थिनी आली होती. हा विषय गंभीर असून याकडे सरकार गांभीर्याने लक्ष देणार. व अशा अनधिकृत शिक्षण संस्थांवर कारवाई करणार. असे प्रकार घडू नयेत, यासाठी पालकांनीही सतर्क रहायला हवे,असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी केले.

pramod sawant
Goa Assembly Monsoon Session 2024: लोकसभा निकालानंतर पहिले अधिवेशन, कोणते मुद्दे गाजणार?

शिक्षकांचाही गौरव

कार्यक्रमात सर्वप्रथम मतदारसंघातील सर्व हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयांमधील ज्येष्ठ शिक्षकांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर बारावी व दहावीत विशेष गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com