Goa Corona Update
Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यात आजवर 4,012 कोरोना रूग्णांचे बळी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Corona Update: गोव्यात नव्यानं वाढ होणाऱ्या कोरोना रूग्णांची (Goa Corona Cases) संख्या कमी झाली आहे. सोमवारी राज्यात केवळ सात रूग्णांची नोंद झाली तर, आज (मंगळवारी) 37 रूग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात मृत्यूची नोंद झाली नसली तरी, मागील 46 मृतांची आता नोंद झाल्याने, राज्यातील एकूण मृतांची संख्या 4,012 एवढी झाली आहे.

गोवा आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज दिवसभरात 37 नव्या रूग्णांची नोंद झाली असून, 40 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 2 लाख 58 हजार 356 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 54 हजार 207 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 98.39 टक्के एवढा झाला आहे.

मंगळवारी दिवसभरात 1,075 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्याच्या घडीला गोव्यात 137 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज नोंदवण्यात आलेल्या 46 मृतांची संख्या ही जुलै 2020 ते जानेवारी 2022 या कालावधीत झालेली आहे. असे आरोग्य खात्याने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT