पणजी: गोव्यात २०२४ मध्ये १५ एड्स बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २४० रुग्णांची नव्याने नोंद झाली. गोवा राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या वतीने याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी ०१ डिसेंबर हा दिवस एचआयव्ही एड्सबाबत जनजागृतीसाठी साजरा केला जातो.
गोवा राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, राज्यात २०२४ मध्ये एचआयव्हीचे २४० नवीन रुग्ण आढळले. हे प्रमाण २०२३ मध्ये नोंदविलेल्या २७० रुग्णांच्या तुलनेत किंचित कमी आहेत. गोवा राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या प्रकल्प संचालक डॉ. ललिता उमरस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी एड्समुळे १५ लोकांचा मृत्यू झाला, तर २०२३ मध्ये ३२ जणांचा मृत्यू झाला होता.
एड्सचे संक्रमण कशामुळे होते? What Causes AIDS?
१) असुरक्षित लैंगिक संबंध : एचआयव्ही एड्स होण्याचे प्रमुख कारणांध्ये असुरक्षित लैंगिक संबंध एक कारण आहे. लैंगिक संबंधात कंडोमचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.
२) गर्भधारणा आणि आईकडून मुलाला संक्रमण: एड्सबाधित आईकडून मुलाला देखील याची बाधा होऊ शकते. तसेच, आईच्या दुधातून मुलाला बाधा होऊ शकते.
३) सुईद्वारे संक्रमण : संक्रमित रक्ताचा दूषित सुया वापरल्याने देखील याचे संक्रमण होऊ शकते.
४) असुरक्षित रक्तदान : असुरक्षित रक्तदानातून देखील विषाणूचे संक्रमण होऊ शकते.
काय काळजी घ्यावी! Preventive Measures
१) लैंगिक संबंध प्रास्थापित करताना कंडोमचा वापर करावा.
२) सुरक्षित सुयांचा वापर, ऑटो डिस्पोजल सिरिंज वापरल्याने संक्रमण रोखण्यास मदत होते.
३) रक्तदान किंवा रक्त घेताना सुरक्षित पर्यायांचा अवलंब करणे आवश्यक आहे.
४) गर्भवती महिला एचआयव्ही बाधित असल्यास त्यांचे योग्य समुपदेशन करणे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.