Goa Corona Updates  Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: दिलासादायक! गोव्यात गेल्या 24 तासांत एकही नव्या कोरोना रुग्णांची नोंद नाही

गेल्या 24 तासांत गोव्यात 28 नमूने तपासण्यात आले.

Pramod Yadav

Goa Corona Update: गोव्यासह देशातील विविध राज्यात जेएन-1 व्हेरिएंटच्या कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. राज्यात यापूर्वी 19 रुग्णांची नोंद झाली होती. दरम्यान, गेल्या 24 तासांत राज्यात नव्याने एकही कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

गोवा आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 28 नमूने तपासण्यात आले. त्यापैकी एकही नमूना सकारात्मक आलेला नाही. सध्या घडीला गोव्यात 37 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 98.46 टक्के एवढा झाला आहे.

जेएन-1 व्हेरिएंटच्या आकडेवारीबाबत संभ्रम

देशात कोरोनाच्या जेएन-1 या नव्या व्हेरिएंटचे गोव्यात सर्वाधिक म्हणजेच 34, तर महाराष्ट्रात 9, कर्नाटकात 8, केरळात 6, तामिळनाडूत 4 आणि तेलंगणात 2 रुग्णांचा समावेश आहे.

मात्र, गोव्यातून कोविडचा उपप्रकार जेएन -1 रुग्णांची संख्या 19 इतकी पाठवण्यात आली होती. मात्र केंद्रस्तरावर हा आकडा दोनदा मोजला गेला असून गोव्यातील रुग्णसंख्येबाबत गोंधळ झाला, अशी माहिती गोमेकॉचे डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US War Ceasefire: युद्धविरामानंतर तेहरानच्या रस्त्यांवर जनसागर, विजयाचा जल्लोष साजरा! "आम्ही झुकणार नाही", म्हणत इराणी नागरिकांचं शक्तीप्रदर्शन VIDEO

South Goa Overseas Job Scam: केपे, सासष्टी आणि काणकोणातील तरुण 'लेडी नटवरलाल'च्या जाळ्यात, विदेशात नोकरीचे आमिष दाखवून घातला 50 लाखांचा गंडा

Iran US War Ceasefire: 40 दिवसांचा रक्तरंजित संघर्ष थांबला! इराण-अमेरिका यांच्यात युद्धविराम; पण 'त्या' 10 अटींवरुन जगात खळबळ

Goa Assembly Election: 2027 मध्ये रितेश नाईकच हवेत, मगोचा आग्रह; फोंडा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत दीपक ढवळीकरांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य

Pooja Naik: ‘सॉरी’वरच प्रकरण मिटवलं! कोलवाळ तुरुंग प्रशासनाचा घोळ; पूजा नाईक बेकायदा बाहेर

SCROLL FOR NEXT