Goa JN1 Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa JN1 Corona Update: गोव्यात जेएन 1 व्हेरिंटच्या नव्या 39 रुग्णांची नोंद, देशात राज्य पाचव्या स्थानी

जेएन 1 व्हेरिंटचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यात गोवा पाचव्या स्थानी आहे.

Pramod Yadav

Goa JN1 Corona Update: गोव्यात जेएन 1 व्हेरिंटच्या 39 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील या व्हेरिंटची संख्या 90 झालीय. जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आलेले सर्व 39 नमूने जेएन 1 व्हेरिंट चाचणीत सकारात्मक आले आहेत.

यामुळे जेएन 1 व्हेरिंटचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यात गोवा पाचव्या स्थानी आहे.

गोव्यात मागील 15 दिवसात गोळा करण्यात आलेले नमून उत्तर गोव्यातील रुग्णालयात जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले होते. चाचणीसाठी पाठवण्यात आलेले सर्व 39 जेएन 1 व्हेरिंट चाचणीत सकारात्मक आले.

देशातील 16 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात आजवर एकूण 1,104 जेएन 1 व्हेरिंटचे रुग्ण आढळून आले आहेत. कर्नाटक 214 रुग्णासह आघाडीवर असून, आंध्रप्रदेशात 189, महाराष्ट्रात 170, केरळमध्ये 154 आणि गोवा 90 रुग्णासह पाचव्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, शुक्रवारी गोव्यात एक नव्या कोरोना रुग्णाची भर पडली. यासह राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 26 एवढी झाली आहे. शुक्रवारी 150 नमूने तपासण्यात आले त्यापैकी एक सकारात्मक आला. राज्याचा रिकव्हरी रेट 98.47 टक्के एवढा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT