Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यात रविवारी 30 नवे कोरोना रूग्ण, 41 जणांना डिस्चार्ज

गोव्यात सध्याच्या घडीला 219 सक्रिय कोरोना रूग्ण आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात आज दिवसभरात 30 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 41 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात 687 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले. राज्यातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असून, सध्याच्या घडीला 219 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

गोवा आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 58 हजार 143 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 53 हजार 958 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रिकव्हरी रेट वाढून 98.38 टक्के एवढा झाला आहे.

मागील तीन आठवड्यात राज्यात एकाही कोरोना रूग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आजवर राज्यात 3,966 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात 37,444 सक्रिय कोरोना रूग्ण

देशातील कोरोना रूग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत 3,364 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली असून, 4,206 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला देशात 37,444 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत 26 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर देशात 5 लाख 28 हजार 673 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT