Goa Loksabha Voting Dainik Gomantak
गोवा

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Loksabha Voting: राज्यातील मतदानाचा टक्का 75 ते 80 पर्यंत जाण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Pramod Yadav

Goa Loksabha Voting

गोव्यात आज (07 मे) दोन लोकसभा जागांसाठी मतदान सुरु असून, दुपारी तीन वाजेपर्यंत 61.39 टक्के मतदान झाले आहे. पैकी उत्तर गोव्यात 61.28 टक्के तर दक्षिण गोव्यात 61.50 टक्के मतदानाची नोंद झालीय.

सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार असून, आता मतदानासाठी केवळ दोन तास शिल्लक आहेत.

राज्यातील तापमानाचा चढता पारा लक्षात घेता सकाळीच राज्यातील मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी हजेरी लावली. सकाळी नऊपर्यंत दोन्ही मतदारसंघात मिळून एकूण 13.02 टक्के मतदानाची नोंद झाली. तर, अकरापर्यंत एकूण 30.90 टक्के मतदान झाले. यात उत्तेरत 30.31 तर दक्षिणेत 31.56 टक्के मतदानाची नोंद झाली.

दुपारी एकपर्यंत राज्यातील मतदान टक्केवारीचा आकडा पन्नासच्या जवळ पोहोचला. दुपारी एकपर्यंत 49.04 टक्के मतदान नोंदविण्यात आले. यापैकी उत्तर गोव्यात 48.88 तर दक्षिणेत 49.20 मतदानाची नोंद झाली.

आयोगाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यात एकूण 61.39 टक्के मतदानाची नोंद झाली. यापैकी उत्तर गोव्यात 61.28 टक्के तर दक्षिण गोव्यात 61.50 टक्के मतदानाची नोंद झाली.

दरम्यान, मतदानासाठी आता केवळ दोन तास उरले असून, उन्हाचा तडाखा देखील कमी झाल्याने मोठ्या प्रमाणावर मतदार मतदान केंद्रावर दाखल होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Coconut Price: महागाईत गणेशोत्सवाचा आनंद वाढला! म्हापशात अवघ्या 2 रुपयांत नारळ; दोन दिवसांत तब्बल 9 ते 10 हजार नारळांचे वाटप

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT