Heavy Rain in Panjim Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात आतापर्यंत एकूण 47.36 इंच पावसाची नोंद

यंदाचा पाऊस गेल्यावर्षी याच कालावधीत पडलेल्या पावसाच्या सरासरीपेक्षा 13 टक्क्यांनी जास्त आहे.

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात पावसाने दाणादाण उडवून दिली असतानाच मागच्या वर्षीपेक्षा यंदा 13 टक्के जास्त पाऊस पडल्याची आकडेवारी समोर आली आहे. 1 जून ते 5 जुलैदरम्यान राज्यात एकूण 47.36 इंच पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस गेल्यावर्षी याच काळात पडलेल्या पावसापेक्षा सरासरी 13 टक्क्यांनी जास्त आहे.

दुसरीकडे गोव्यात पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने भूस्खलन, वाहतूक कोंडी, पूर आणि मालमत्तेचं नुकसान होत आहे. आयएमडीने 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र आणखी दोन दिवस परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मागील अंदाजानुसार, 5 ते 9 जुलै दरम्यान गोव्यात अति मुसळधार पावसाची (>11.5cm) शक्यता गोवा हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच मच्छिमारांना 5 दिवस समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाने कालपासून जोर धरल्याने राज्यात बऱ्याच ठिकाणी पाणी भरण्याचे प्रकार वाढले आहेत. दक्षिण गोव्यातही मुसळधार पावसाने दाणादाण उडाली असून दरवर्षीप्रमाणे गुडी पारोडा रस्ता पाण्याखाली गेला आहे. पारोडा येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद झाली आहे.

केपे ते मडगाव हा मुख्य रस्ता पर्वत पारोडा येथे पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक चांदर मार्गे वळविण्यात आली आहे. आज मंगळवारी सकाळी 11 वाजता पारोडा येथे रस्ता पाण्याखाली गेला, तसेच पारोडा येथील कुशावती नदीवरील पूलही पाण्याखाली गेल्याने तो रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

SCROLL FOR NEXT