corona Omicron Variant

 
Dainik Gomantak
गोवा

गोव्यात आणखी 4 जण ओमिक्रॉनबाधित

पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवलेले नमुने पॉझिटिव्ह आल्याने चिंतेत वाढ

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात आणखी 4 जण ओमिक्रॉनने बाधित झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने काही नमुने गोव्यातून पुण्याला पाठवण्यात आले होते. आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे गोव्यासमोर निर्बंधांचं सावट आणखी गडद झालं आहे. पुण्यातील NIV मध्ये हे नमुने पाठवण्यात आले होते.

धक्कादायक बाब म्हणजे ज्या 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यापैकी एका रुग्णाची कोणतीही टॅव्हल हिस्टरी नाही. याचाच अर्थ हा रुग्ण कोणत्याही बाहेरील देशात किंवा राज्यात प्रवास करुन आलेला नाही. त्यामुळे गोव्यात (Goa) आता ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) समूह संसर्गाची भीतीही व्यक्त केली जात आहे. जर गोव्यात समूह संसर्गाची शक्यता असेल तर सरकारला तातडीने उपाययोजना आखणे गरजेचे आहे.

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी (CM) चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. ओमिक्रॉनचं संकट गोव्यावर घोंघावताना दिसत असल्याने गोव्यात निर्बंध आणखी कडक करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT