Goa Weather Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: गोव्यात पुन्हा पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, राज्यात 'यलो अलर्ट'

Goa Weather: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील अनेक भागांत पावसाने पुन्हा हजेरी लावली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील अनेक भागांत पावसाने पुन्हा हजेरी लावली. सत्तरी, डिचोली, पेडणे, धारबांदोडा यांसह विविध भागांत पावसाची नोंद झाली.

गुरुवारी राज्यातील काही भागांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. राजधानी पणजीत सकाळी ढग दाटून आले होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास येथे तुरळक पावसाचा शिडकावा झाला.

मागील आठ दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत होते. विशेषतः भातशेतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, काही भागांत झालेल्या पावसामुळे शेतीवरील संकट काही प्रमाणात दूर झाले आहे.

मागील २४ तासांत राज्यात सरासरी २९.९ मिमी (१.१७ इंच) पावसाची नोंद झाली. आतापर्यंत राज्यात ७९.१७ इंच पाऊस झाला असून, सरासरीच्या तुलनेत सुमारे ३१.७ टक्के तूट आहे. दाबोळीत ३.८ इंच, मुरगाव ३.५५ इंच, काणकोण ३ इंच, मडगाव ३.१४ इंच आणि पणजीत १.५१ इंच पावसाची नोंद झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle: मंत्र्यांचे ग्रेडिंग ठरवणार त्यांचे राजकीय भवितव्य! लवकरच बदलणार मोदी मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा? दिल्लीच्या पॉवर कॉरिडोअरमध्ये हालचालींना वेग

Rashol MRF Case: 'एमआरएफ'ची मूळ फाईल बीडीओकडे कशी पोहोचली? राशोल कचरा प्रक्रिया शेड प्रकरणात गोवा खंडपीठाचा सवाल

Online Services: सरकारची मोठी डिजिटल सुविधा; आता व्हॉट्स-ॲपवरून मिळणार सरकारी सेवा, AI चॅटबॉटचा शुभारंभ

Goa Casino Case: प्रतिज्ञापत्र वेळेत दाखल करा, अन्यथा दंड! 'कॅसिनो' प्रकरणात गोवा खंडपीठाचा प्रतिवादींना स्पष्ट इशारा

Super El Nino: 450000 लोकांच्या जीवाला धोका! 'सुपर एल नीनो' ठरतोय खतरनाक, भारतसह 11 देशांमध्ये वाढला धोका; 2027 जगासाठी ठरणार विध्वंसक? VIDEO

SCROLL FOR NEXT