Goa Shipyard Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Shipyard Accident: शिपयार्ड दुर्घटनेतील ‘त्या’ तिघांचे मृतदेह अखेर नातेवाईकांच्या स्वाधीन! पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

Rasai Lotulim Fire Incident: मागच्या शुक्रवारी या यार्डमध्ये जहाजबांधणीचे वेल्डिंगचे काम चालू असताना अचानक आगीचा भडका उडून सात कामगार होरपळे होते.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: रासई - लोटली येथील विजय मरीन शिपयार्डमध्ये झालेल्या दुर्घटनेत मरण पावलेल्या त्या तीन कामगारांचे मृतदेह वैद्यकीय तपासणीनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मागच्या शुक्रवारी या यार्डमध्ये जहाजबांधणीचे वेल्डिंगचे काम चालू असताना अचानक आगीचा भडका उडून सात कामगार (Worker) होरपळे होते. त्यातील शेर अली एमडी अली (२२, रा. पश्चिम बंगाल) व विनोद दिवान (४२, रा. झारखंड) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर संतोष कुमार (३०, रा. झारखंड) याचा गोमेकॉत उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केल्याची माहिती मायणा कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांनी दिली.

या दुर्घटनेत महम्मद बाबुल, अभिषेक सिंग, मनीष चौहान, सुरेन्द्र कुमार हे कामगारही गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे अशी माहितीही पोलिसांनी दिली.

सध्या या शिपयार्डचे काम बंद ठेवण्यात आले आहे. तेथे पोलिस (Police) पहारा ठेवला आहे. मृत कामगारांच्या कुटुंबीयांनी या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे या तिघांचा नाहक बळी केल्याची तीव्र भावना व्यक्त करताना प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी व कंपनीने मृतदेह त्यांच्या मूळ घरी पाठवून द्यावी, अन्यथा आम्ही मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतली होती, परंतु मृत कामगारांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात काहीच माहिती मिळू शकली नाही. कारखाने आणि बाष्पक खात्याला या शिपयार्डमध्ये सुरक्षिततेची कुठलीही उपाययोजना नसल्याचे तपासात आढळून आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT