Goa Waste Management Dainik Gomantak
गोवा

Goa Waste Management Project: राज्यात उभारणार खत निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; डिचोलीत केली जागेची पाहणी

Goa Rapid Composting Project: मुख्यमंत्र्यांनी डिचोली पालिकेच्या लाखेरे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पस्थळी उभारण्यात आलेल्या निसर्गरुणा रॅपिड कंपोस्टींग प्रकल्पाची पाहणी केली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: राज्यातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शास्त्रीय आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी राज्यातील पालिका आणि ग्रामपंचायत क्षेत्रात टप्प्याटप्प्याने निसर्गरुणा रॅपिड कंपोस्टींग प्रकल्प उभारणार, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली येथे केली.

मुख्यमंत्र्यांनी डिचोली पालिकेच्या लाखेरे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पस्थळी उभारण्यात आलेल्या निसर्गरुणा रॅपिड कंपोस्टींग प्रकल्पाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. संपूर्णअर्थ आणि इंडिगो एअरलाइन्सच्या ‘सीआरएस’ उपक्रमांतर्गत राज्य सरकारतर्फे हा सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे.

यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, घनकचरा व्यवस्थापन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हरिष अडकोणकर, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. शरद काळे, पंचायत संचालनालयाचे दशरथ रेडकर, नगर प्रशासन खात्याचे ब्रिजेश मणेरीकर यांच्यासह मावळते नगरसेवक उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रशिक्षण

कंपोस्टिंग प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रस्त्यावर कचरा फेकण्याऐवजी कचऱ्याचे संकलन करून त्यापासून त्वरित सेंद्रिय खत निर्मिती करण्यासाठी अभियान राबविण्यात येणार, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT