Goa sexual abuse case Dainik Gomantak
गोवा

80 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार, दुसऱ्यावेळा बलात्काराच्या तयारीत असतानाच पकडले; '50 वर्षीय' आरोपीला 4 दिवसांची कोठडी

Elderly Woman Assaulted: माडेल, थिवी येथे एका ५० वर्षीय व्यक्तीने एकट्या राहणाऱ्या ८० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Akshata Chhatre

थिवी: माडेल, थिवी येथे एका ५० वर्षीय व्यक्तीने एकट्या राहणाऱ्या ८० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी दुसऱ्यांदा लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असतानाच, महिलेचे कुटुंबिय घटनास्थळी पोहोचल्याने हा हल्ला थांबला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. परदेशातील नोकरी सोडून हा आरोपी अनेक वर्षांपासून गोव्यात राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नेमकी घटना काय घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित वृद्ध महिला (८०) आपली दोन्ही मुलींची लग्न झाल्यानंतर एका छोट्या घरात एकटीच राहत होती. तिची एक मुलगी रोज तिला जेवण आणि इतर आवश्यक वस्तू आणून तिची काळजी घेत असे. शुक्रवारी (दि.१९) दुपारचे जेवण घेऊन पीडित महिलेची नात घरी आली असता, वृद्धेने तिला आपल्यासोबत घडलेला भयानक प्रसंग सांगितला.

नातीने तात्काळ आपल्या आई-वडिलांना ही गोष्ट सांगितली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित वृद्धेने गुरुवारी रात्री एका अनोळखी व्यक्तीने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले.

त्यानंतर, पीडितेच्या मुलीला या हल्ल्याबद्दल कळताच ती लगेच आपल्या आईच्या घरी पोहोचली. तिथे तिने पाहिले की, आरोपी नग्न अवस्थेत तिच्या आईवर पुन्हा लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता.

आरोपीला पकडले, ४ दिवसांची पोलीस कोठडी

पीडितेच्या मुलीने तात्काळ आपल्या पतीला फोन केला. तो आधीच पीडित वृद्धेच्या घराच्या दिशेने येत होता. जावयाने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी तिथून निसटला आणि परिसरातील झुडपांमध्ये लपून बसला. पीडित कुटुंबाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर, पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी एकटाच राहत होता, कारण त्याच्या पत्नीने त्याला सोडून दिले होते. पीडितेचा जबाब एका स्वयंसेवी संस्थेच्याप्रतिनिधींच्या उपस्थितीत नोंदवण्यात आला आहे. आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे उत्तर गोव्यात खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol: 'जमीन रूपांतरास आपला पूर्ण विरोध'! आमदार आरोलकरांचे प्रतिपादन; हरमलवासीयांसोबत राहणार असल्याचा केला दावा

Rope Skipping Championship: राष्ट्रीय रोप स्किपिंगमध्ये गोव्याची उल्लेखनीय कामगिरी! पटकावली 24 पदके

Goa Fire News: चोर्ला घाटात पहाटेच्या सुमारास भीषण आग, बोलेरो टेम्पो जळून खाक; 5 लाखांचे नुकसान

स्वतंत्र गोव्याचे स्वप्न साकार करण्यासाठी ज्यांनी आपले तारुण्य, कुटुंब, प्रसंगी प्राणही अर्पण केले त्यांचे स्मरण होणे आवश्‍यक..

अग्रलेख: '..हा अनागोंदी कारभार गोव्याचे नुकसान करत आहे'! हडफडे अग्निकांडाचा अंजन घालणारा अहवाल

SCROLL FOR NEXT