Goa Crime: धक्कादायक! थिवीत 80 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार; लेक-जावई घरी आल्यावर उघडकीस आला प्रकार

Goa Crime News: घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत संशयित व्यक्ती घरात घुसून वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
80-Year-Old Woman Sexually Assaulted in Thivim, Accused Arrested
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

बार्देश : वृद्ध ८० वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना थिवी - माडेल येथे घडली आहे. घरात कोणी नसताना ५० वर्षीय व्यक्तीने घरात घुसून हे दुष्कर्म केले. कोलवाळ पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, थिवी - माडेल येथे ८० वर्षीय वृद्ध महिलेवर ५० वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला. घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत संशयित व्यक्ती घरात घुसून वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संशयित व्यक्ती पीडित महिलेच्या घराच्या शेजारीच राहतो अशी माहिती समोर आली आहे.

80-Year-Old Woman Sexually Assaulted in Thivim, Accused Arrested
Goa Pune Flight: सायंकाळी साडे सहाला पोहोचणारे विमान रात्री दोनला उतरले; गोवा – पुणे फ्लाईटला 8 तासांचा विलंब, प्रवाशांचा संताप

मुलगी जावई घरी आल्यानंतर उघडकीस आला प्रकार

पीडित महिलेची मुलगी आणि जावई जेवण घेऊन घरी आल्यानंतर संशयित व्यक्ती घरातून पळून गेल्याने हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी कोलवाळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी शनिवारी (२१ जून) सकाळी अटक केली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com