Chandra Tendulkar Dainik Gomantak
गोवा

गोवा रणजी क्रिकेट संघ प्रशिक्षकाच्या शर्यतीत चंद्रा तेंडूलकर

गोव्याचे माजी रणजी क्रिकेटपटू चंद्रशेखर (चंद्रा) तेंडुलकर (Chandra Tendulkar) यांनी गोवा संघाच्या प्रशिक्षकपदासाठी (Coach Of Goa Team) अर्ज केला आहे.

किशोर पेटकर

पणजी: गोव्याचे माजी रणजी क्रिकेटपटू चंद्रशेखर (चंद्रा) तेंडुलकर (Chandra Tendulkar) यांनी गोवा संघाच्या प्रशिक्षकपदासाठी (Coach Of Goa Team) अर्ज केला आहे. गोव्यातील क्रिकेटने आपल्याला भरपूर संधी दिली, आता परतफेड करण्याची ही योग्य आणि चांगली वेळ आहे, क्रिकेटमधील अनुभवाचा लाभ करून देताना गोव्याच्या रणजी संघाला नव्या उंचीवर नेण्याचे लक्ष्य बाळगून प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे, असे तेंडुलकर यांनी सांगितले.

गोमंतकीय क्रिकेटमध्ये सुमारे चार दशके कार्यरत असलेले झुआरीनगर येथील तेंडुलकर हे गोव्याच्या पहिल्या रणजी क्रिकेट संघाचे सदस्य होते. याशिवाय गोव्याचे 19, 22, 25 वर्षांखालील संघाचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. 1985-86 मोसमात त्यांनी कर्नाटकविरुद्ध भद्रावती येथे रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ते सलामीचे फलंदाज होते. गोव्याचा तो रणजी क्रिकेट स्पर्धेतील पहिलाच मोसम होता. ते गोव्याच्या व्हेटरन्स क्रिकेट संघाचे कर्णधार आहेत.

प्रशिक्षकपदासाठी चुरस

गोव्याच्या रणजी क्रिकेट प्रशिक्षकसाठी दिल्लीचे माजी फलंदाज भास्कर पिल्लई, ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू शेन टेट, मुंबईचे माजी रणजीपटू सुलक्षण कुलकर्णी व संदीप दहाड, कर्नाटकचे माजी रणजीपटू मन्सूर अली खान आदींनी अर्ज केले आहेत. रणजी संघ प्रशिक्षक ठरविण्यासाठी गोवा क्रिकेट असोसिएशनच्या समितीची नुकतीच बैठक झाली होती, लवकरच प्रशिक्षक नियुक्तीवर शिक्कामोर्तब होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT