Snehal Kavathankar Dainik Gomantak
गोवा

Snehal Kavathankar: गोवा क्रिकेटसाठी मोठी बातमी! कर्णधार 'स्नेहल'ला प्रतिष्ठेचा सन्मान; BCCI च्या पुरस्काराचा होणार मानकरी

Snehal Kavathankar BCCI Award: गोव्याचा रणजी क्रिकेट संघ कर्णधार स्नेहल कवठणकर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित होईल.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्याचा रणजी क्रिकेट संघ कर्णधार स्नेहल कवठणकर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित होईल. त्याची २०२४-२५ मोसमातील प्लेट विभागातील सर्वाधिक धावांसाठी मानाच्या ‘माधवराव शिंदे पुरस्कारा’साठी निवड झाली आहे.

बीसीसीआयचा वार्षिक ‘नमन २०२४-२५’ पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (ता. १५) संध्याकाळी होईल. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट विभागात २०२४-२५ मोसमात स्नेहलने सहा सामन्यांतील सात डावांत सर्वाधिक ९४९ धावा केल्या होत्या. या कामगिरीबद्दल त्याची ‘माधवराव शिंदे पुरस्कारा’साठी निवड झाल्याची माहिती गोवा क्रिकेट असोसिएशनतर्फे (जीसीए) देण्यात आली.

बीसीसीआयचा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार पटकावणारा स्नेहल पहिला गोमंतकीय क्रिकेटपटू ठरला आहे. गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महेश देसाई, सचिव तुळशीदास शेट्ये, तसेच व्यवस्थापकीय समिती सदस्यांनी अभिनंदन केले आहे. “स्नेहलची कामगिरी गोमंतकीय क्रिकेटसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.

क्रिकेटमधील त्याचे योगदान त्याच्या कठोर परिश्रम, शिस्त आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाचे प्रतीक आहे,” असे महेश यांनी सांगितले. तीस वर्षीय स्नेहलने फेब्रुवारी २०१५ मध्ये ओंगोले येथे आंध्रविरुद्ध रणजी क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केल्यापासून ६५ सामन्यांतील १०९ डावांत ४६.०१च्या सरासरीने ४४१७ धावा केल्या आहेत. यामध्ये १० शतके व १६ अर्धशतकांचा समावेश आहे.

एक त्रिशतक, दोन द्विशतके!

स्नेहल कवठणकरने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या २०२४-२५ मधील प्लेट विभागीय मोसमात सहा सामन्यांतील सात डावांत १८९.८०च्या सरासरीने ९४९ धावा केल्या. त्याने शतकी खेळीत एकवेळ त्रिशतक, तर दोन वेळा द्विशतके झळकावली. एका रणजी मोसमात गोव्यातर्फे सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता स्नेहलच्या नावे नोंदीत आहे. २०२४-२५ मोसमातील अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या पर्वरी येथील लढतीत स्नेहलने कश्यप बखले याच्यासमवेत भारतीय क्रिकेटमधील विक्रमी भागीदारी रचली. स्नेहल (नाबाद ३१४) व कश्यप (नाबाद ३००) यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेली ६०६ धावांची अभेद्य भागीदारी देशात सर्वोच्च, तर जागतिक क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाची आहे.

स्नेहलचे २०२४-२५ मोसमातील सातत्य

मणिपूरविरुद्ध पर्वरी येथे ४१ धावा

सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी केली नाही

नागालँडविरुद्ध पणजी जिमखान्यावर ४ व ७५ धावा

अहमदाबाद येथे मिझोरामविरुद्ध २५० धावा

पर्वरीत अरुणाचल प्रदेशविरुद्ध नाबाद ३१४ धावा

सोविमा येथे प्लेट अंतिम लढतीत नागालँडविरुद्ध ६३ व नाबाद २०२ धावा

संकलन ः किशोर पेटकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT