Goa Rajyasabha Election 2023 | Sadanand Shet tanavade Nomination Dainik Gomantak
गोवा

Goa Rajyasabha Election 2023: सदानंद शेट तानावडे राज्यसभेवर बिनविरोध

विरोधकांची माघार : मुख्यमंत्र्यांसोबत भरला उमेदवारी अर्ज

गोमन्तक डिजिटल टीम

Rajyasabha Election 2023: राज्यसभेच्या गोव्यातील एकमेव जागेसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आज, मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला.

दुसरीकडे विरोधकांनी रणनीतीचा भाग म्हणून आपण या निवडणुकीत भाग घेणार नाही, असे जाहीर केल्याने तानावडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

भाजपच्या केंद्रीय समितीने आजच त्यांच्या नावाची घोषणा केली होती. राज्यात भाजपप्रणीत सरकारकडे दोन तृतीयांश बहुमत असल्याने तानावडे बहुमताने निवडून येतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तानावडे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. दुसरीकडे विरोधकांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याने निवडणुकीचे चित्रच पालटले.

तानावडे यांचा उमेदवारी अर्ज राज्यसभा निवडणूक अधिकारी नम्रता उल्मन यांच्याकडे सादर करताना सावंत मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्री, आमदार मगोपसह समर्थक अपक्ष आमदार, पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

गोव्यातील राज्यसभेच्या जागेची मुदत 28 जुलै रोजी संपत असल्याने त्यासाठी 24 जुलै रोजी मतदान होत आहे. दरम्यान, तानावडे राज्यसभेवर गेले, तरीही लोकसभा निवडणुकीपर्यंत तेच प्रदेशाध्यक्षपदी राहतील, अशी शक्यता आहे.

13 जुलै रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून 14 जुलै रोजी अर्जांची छाननी होईल, तर 17 जुलैला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

‘आप’ लढणार नाही!

गोव्यातील राज्यसभेच्या जागेसाठी आम आदमी पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने उमेदवार उभा केला जाणार नाही, अशी माहिती पक्षाचे राज्य संयोजक अमित पालेकर यांनी दिली.

विधानसभेत ‘आप’चे दोन सदस्य असून ते काँग्रेससोबतच्या संयुक्त विरोधी आघाडीत आहेत, असे सांगत या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याबाबत पालेकर यांनी नकार दिला.

भाजपला पाठिंबा नाही :

आज संयुक्त विरोधी आघाडीची बैठक विरोधी पक्षनेत्यांच्या कक्षामध्ये झाली. या बैठकीला काँग्रेसचे ३, ‘आप’चे २ आणि आरजी व गोवा फॉरवर्डचा प्रत्येकी एक मिळून असे ७ सदस्य उपस्थित होते.

यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, आम्ही भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. तसेच या निवडणुकीत सहभागी होणार नाही.

आमच्याकडे भाजपचे २८, मगोपचे २ आणि तीन अपक्षांसह ३३ सदस्यांचे समर्थन आहे. विरोधी गटातील सदस्यांनी आपला उमेदवार उभा न करता आम्हाला पाठिंबा द्यावा. सर्वच सदस्यांना तानावडे यांना मतदान करण्याचे आवाहन करतो.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

भाजप हा सामान्य कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल घेणारा पक्ष आहे. त्यामुळेच माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला ही मोठी जबाबदारी दिली आहे. याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आभार मानतो. विरोधी सदस्यांनी मला पाठिंबा द्यावा.

- सदानंद तानावडे. प्रदेशाध्यक्ष.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT