Goa Rajyasabha Election 2023 | Sadanand Shet tanavade Nomination Dainik Gomantak
गोवा

Goa Rajyasabha Election: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित सदानंद शेट तानावडे यांनी दाखल केला राज्यसभेसाठी अर्ज

विद्यमान खासदार विनय तेंडुलकर यांची राज्यसभेची मदत 27 जुलैला संपत आहे.

Pramod Yadav

Goa Rajyasabha Election 2023: गोव्यातील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet tanavade) यांचा उमेदवारी अर्ज राज्यसभा निवडणूक अधिकारी नम्रता उलमन यांच्याकडे दाखल करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री, भाजप आमदार, पक्षाच्या सुकाणू समितीचे सदस्य उपस्थित होते.

विद्यमान खासदार विनय तेंडुलकर यांची राज्यसभेची मदत 27 जुलैला संपत आहे. राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 13 जुलै असून 17 जुलै पर्यंत अर्ज माघारी घेता येतील. 24 जुलै रोजी यासाठी विधानसभेत मतदान होईल.

विरोधी आमदारांनी आम्हाला मतदान करावे यासाठी प्रयत्न करणार असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

आम आदमी पक्ष नाही लढणार निवडणूक

गोव्यातील राज्यसभा जागेसाठी आम आदमी पक्षाच्या ( AAP ) वतीने उमेदवार दिला जाणार नाही. पुरेसे संख्याबळ नसल्याने पक्षाने उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे. असे अमित पालेकर यांनी म्हटले आहे. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याबाबत पालेकर यांनी नकार दिला आहे.

भाजपकडील संख्याबळ पाहता तानावडे बहुमताने निवडून येतील. जर विरोधकांनी आपला उमेदवार उभा केला नाही, तर तानावडे बिनविरोध निवडून येण्याचीही शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT