Goa Governor PS Pillai CM Pramod Sawant At Rajbhavan Dainik Gomantak
गोवा

PM Modi Birthday: गोव्याच्या राज्यपालांकडून मोदींना अमूल्य बर्थडे गिफ्ट, प्राचीन वृक्षांचे केले जाणार जतन

PM Narendra Modi Birthday: उपक्रमाचा शुभारंभ करण्यापूर्वी राज्यपालांनी मोदींच्या वाढदिवसानिमित्त विविध मंदिर आणि चर्चमध्ये प्रार्थना केली.

Pramod Yadav

पणजी: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. मोदींवर देश विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गोव्यात मात्र अनोख्या पद्धतीने मोदींचा वाढदिवस साजरा करत त्यांना वाढदिनी अमूल्य भेट देण्यात आलीय.

गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गोव्यातील प्राचीन वृक्षांचे जतन करण्याच्या उद्देशाने एक उपक्रम सुरू केला.

गोवा राजभवन येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत "प्राचीन वृक्ष आयुर्वेदिक चिकीत्सा" उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

उपक्रमाचा शुभारंभ करण्यापूर्वी राज्यपालांनी मोदींच्या वाढदिवसानिमित्त विविध मंदिर आणि चर्चमध्ये प्रार्थना केली.

राज्याच्या कल्याणासाठी प्राचीन वृक्षांचे संरक्षण महत्त्वपूर्ण आहे आणि समाजाने आगामी पिढीसाठी वृक्षांचे संरक्षण केले पाहिजे, असे राज्यपाल म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी वारसा वृक्षांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी राज्यपाल करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले, तसेच नागरिकांनी या कार्यात सामील होण्याचे आवाहन केले.

"प्राचीन वृक्ष आयुर्वेदिक चिकीत्सा' नावाच्या या अनोख्या उपक्रमाच्या उद्घाटनात सामील होताना आनंद होत असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

कोट्टक्कल आर्य वैद्य साला, केरळचे डॉ. पी.एम. वरियर (व्यवस्थापकीय विश्वस्त) आणि कोईम्बतूर आर्य वैद्य फार्मसीचे देवीदास वारियर (व्यवस्थापकीय संचालक) हे देखील यावेळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: पहिली ते आठवीपर्यंतच्‍या प्रश्‍‍नपत्रिका 'एससीईआरटी'च तयार करणार! परिपत्रक लवकरच जारी

WPL 2026: जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स सज्ज; सराव करण्यासाठी खेळाडू गोव्याच्या मैदानात Watch Video

Olive Ridley: गालजीबाग किनाऱ्यावर 'रिडले'ची 109 अंडी, केंद्रात उबवण्यासाठी लागणार 48 ते 58 दिवस

सरकारी कार्यालयांत शुकशुकाट, वास्कोत परिणाम; वर्षअखेर बहुतांश कर्मचारी रजेवर

Arpora Nightclub Fire: हडफडेतील क्लब संरचना मूलतःच बेकायदेशीर, व्यापार परवाना नाही हे माहित होते; पंचायत सचिवाची जबानी

SCROLL FOR NEXT