पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गांधीनगरमध्ये चौथ्या ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टमेंट समिट आणि एक्सोचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतरच्या भाषणात पंतप्रधानांनी 2047 पर्यंत देशाला विकसित करण्याच्या आपल्या ध्येयाचा पुनरुच्चार केला.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Invest 2024 मध्ये दिलेले प्रत्येक लक्ष्य गोव्यात देखील राबविण्याचे आश्वासन सावंत यांनी दिले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काय म्हणाले?
'पंतप्रधान सूर्य घर योजना असो किंवा पीएम कुसुम योजना, आम्ही गोव्यात या योजना राबवू. यासोबतच गोव्यात सौरऊर्जा, जलविद्युत किंवा पवन ऊर्जेसाठी आम्ही निविदाही जारी केल्या आहेत. याशिवाय 2070 पर्यंत देशाचे कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचे लक्ष्य 2050 पर्यंत गोव्यातच गाठले जाईल.'
'गोव्यातील खाणींचा लिलाव सुरू केला आहे. अनेक खाणींचा लिलाव यापूर्वीच झाला आहे. या वर्षापासून खाणींमध्ये १०० टक्के काम सुरू होईल. याशिवाय आम्ही डंप पॉलिसीवरही बरेच काम केले आहे.'
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 2047 पर्यंत देश विकसित करण्याच्या आपल्या ध्येयाचा पुनरुच्चार केला. 2047 पर्यंत भारताला विकसित कसे करता येईल या कृती आराखड्याचा हा एक भाग असल्याचे मोदी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.