Goa fire brigade Dainik Gomantak
गोवा

Goa Fire Brigade: 15 दिवस, 386 कॉल्स! ‘अग्निशमन’ने वाचविली 1.87 कोटींची मालमत्ता; पावसामुळे वाढल्या पडझडीच्या घटना

Goa Fire Brigade Action: मागील पंधरा दिवसांत अग्निशमन दलाला एकूण ३८६ कॉल्स आले. त्यापैकी तब्बल २७३ कॉल्स हे केवळ पावसामुळे झालेल्या पडझडीसंबंधी होते.

Sameer Panditrao

Goa Fire Services : राज्यात मागील दोन-चार दिवसांपासून पावसाची तीव्रता वाढली आहे, त्यामुळे पावसामुळे झाडे कोसळणे, दरड कोसळणे असे प्रकार वाढले असून मागील दोन-चार दिवसांत या प्रकारांमुळे अग्निशमन दलाला हवामान, पावसामुळे होणाऱ्या अपघातांसंबंधी येणाऱ्या आपत्कालीन कॉल्सच्या संख्येत वाढ झाली आहे.

मागील पंधरा दिवसांत आग लागणे, आपत्कालीन परिस्थिती आणि हवामानसंबंधी घटना आदींपासून ३१ लाख ५३ हजार ५०० रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले तर १ कोटी ८७ लाख ५० हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मागील पंधरा दिवसांत पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीतून २ नागरिकांना वाचविण्यात आले.

मागील पंधरा दिवसांत अग्निशमन दलाला एकूण ३८६ कॉल्स आले. त्यापैकी तब्बल २७३ कॉल्स हे केवळ पावसामुळे झालेल्या पडझडीसंबंधी होते. उर्वरित २५ कॉल्स हे आगीच्या घटना, आपत्कालीन स्थितीसंबंधी- ८३, जिओफिसिकल- २, हायड्रोलॉजिकल- २ आणि इतर- १ अशी संख्या आहे.

मागील पंधरा दिवसांत आलेल्या कॉल्सच्या तुलनेत मागील तीन-चार दिवसांतच कॉल्सची संख्या अधिक वाढली आहे. १३ जून ते १५ जूनदरम्यान सर्वाधिक १७४ कॉल्स आले आहेत, त्यातील बहुतांशी कॉल्स हे पावसामुळे झालेल्या पडझड, झाड कोसळणे आदींचे आहेत.

अग्निशमनला आलेले कॉल्स

तारीख एकूण कॉल्स

१ ते ३ जून ५१

४ ते ६ जून ६३

७ ते ९ जून ३७

१० ते १२ जून ६१

१३ ते १५ जून १७४

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT