Taleigao Fire: ताळगाव मार्केटमधील दुकान आगीत खाक, 15 लाखांचे नुकसान; शॉर्ट सर्किटमुळे आगीची शक्यता

Taleigao Shop Fire: ताळगाव येथील सांपॉल मार्केटातील कोलवाळकर प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या इलेक्ट्रिकल व स्टेशनरी दुकानाला आग लागून दुकानातील संपूर्ण सामान जळून खाक झाले.

पणजी: ताळगाव येथील सांपॉल मार्केटातील कोलवाळकर प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या इलेक्ट्रिकल व स्टेशनरी दुकानाला आग लागून दुकानातील संपूर्ण सामान जळून खाक झाले. आगीत सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज मालकाने व्यक्त केला आहे. या इमारतीमधील सर्व दुकाने बंद झाल्यानंतर ही आग सोमवारी रात्री ११ च्या सुमारास लागली.

अग्निशमन दलाच्या जवानाने ही आग वेळीच आटोक्यात आणल्याने बाजूला असलेल्या दुकानापर्यंत ही आग पोहचली नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला आहे.

सांपॉल मार्केटमध्ये गोविंद च्यारी यांचे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक स्टेशनरी फोटो स्टुडिओ यांचे दुकान आहे. काल रात्री ९.३० च्या सुमारास ते दुकान बंद करून घरी गेले. दुकानातून धूर येऊ लागल्याचे तेथून जाणाऱ्या एका पादचाऱ्याने पाहिले. त्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याच्या बंबने आग विझवण्यास सुरुवात केली. दुकानाचे शटर बंद असल्याने त्याची कुलूपे तोडण्यात आली. शटर उघडण्यात आले तेव्हा आतमध्ये आगीने पेट घेतला होता. आतमधील सामान जवळजवळ खाक झाले होते. हे दुकान असलेल्या इमारतीच्या बाजूला इतर दुकाने आहेत, तर पहिल्या मजल्यावर निवासी फ्लॅट आहेत. या आगीची थोडी झळ पल्लवी रेस्टॉरंटला लागली. या आगीमागील कारण शोधण्यासाठी अग्निशमन दलाने वीज खात्याला त्याची तपासणी करण्याचे पत्र पाठवले आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनाही माहिती देण्यात आल्याचे पणजी अग्निशमन दलाचे प्रमुख रुपेश सावंत यांनी सांगितले.

शॉर्ट सर्किटमुळे आगीची शक्यता

दुकान मालक गोविंद च्यारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, रात्री दुकान बंद करून घरी परतल्यानंतर रात्री ११ च्या सुमारास मित्राचा फोन आला. दुकानातून धूर येत आहे असे कळविले. तेथे जमलेल्या लोकानी त्वरित अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. दुकान पूर्ण खाक झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळेच लागली असण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com