
Goa Flood News: तळपण नदीचे पात्र ओसंडून वाहू लागल्याने तळपण नदी किनाऱ्यावरील आमोणे, खोतीगाव येथील शेतकऱ्यांच्या पिकाबरोबरच शेतकी साधन सुविधा वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत.
आमोणे येथील प्रसाद वेळीप यांची शेतात एका खोलीत साठवून ठेवलेल्या सुपाऱ्या वाहून गेल्या. त्याचप्रमाणे ठिबक जलसिंचनासाठी ठेवलेले पाईप वाहून गेले. जलसिंचनाच्या काही सामग्रीचे नुकसान झाले आहे, असे प्रसाद वेळीप यांनी सांगितले.
खोतीगाव येथील दया ऊर्फ उमेश गावकर यांचे तारेचे कुंपण वाहून गेले आहे. सुकडतळे येथील विष्णू गावकर यांच्या शेतीतील ऊस वाहून गेला आहे, तर जगदीश वेळीप यांचे तारेचे कुंपण वाहून गेले आहे. मुसळधार पावसामुळे तळपण नदी ओसंडून वाहात असल्याने नदी परिसरातील शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
वाळपई भागात गटारांतील गाळ अद्याप रस्त्यांवरच
वाळपई नगरपालिका क्षेत्रात उन्हाळ्यात मान्सूनपूर्व कामे केली होती. एकूण दहा प्रभाग क्षेत्रात असलेल्या गटारांतील केर कचरा, घाण उपसण्यात आली होती, पण त्यातील काही ठिकाणी गटारातून उपसलेला हा चिखलमय गाळ तसाच रस्त्यावर पडून आहे.
ठाणे मार्गावरील अंतर्गत रस्त्यावर ही स्थिती आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. अंतर्गत असलेल्या रस्त्यांवर गाळ उपसून ठेवल्याने लोकांना समस्यांना सामोरे जावे लागते आहे. त्याकडे पालिकेचे दुर्लक्षच झालेले आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गटारावरील लाद्या काढून गटारातील कचरा काढण्यात आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी उपसलेला गाळ उचलेला आहे, परंतु अजूनही काही ठिकाणी गाळ तसाच पडून असल्याचे दिसून येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.