Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: गोव्यात मान्सूनचा जोर वाढणार! IMD कडून पुढील 4 दिवस मध्यम पावसाचा अंदाज; यलो अलर्ट जारी

Goa Rain Update: चार-पाच दिवसांपासून राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत असून सत्तरी, काणकोण, साखळी भागात पावसाचा जोर अधिक आहे.

Sameer Amunekar

पणजी: चार-पाच दिवसांपासून राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत असून सत्तरी, काणकोण, साखळी भागात पावसाचा जोर अधिक आहे. आत्तापर्यंत राज्यात ७२७ मिमी म्हणजेच २८.६५ इंचाचा टप्पा पूर्ण केला आहे.

पुढील चार दिवस राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत सरासरी २२.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली तर सांखळी येथे सर्वाधिक ४२.२ मिमी इतका पाऊस नोंदविण्यात आला.

त्याखालोखाल जुने गोवा ३७.४ मिमी, वाळपई ३४ मिमी, पेडणे ३०.४ मिमी, धारबांदोडा २८.४ मिमी, फोंडा २५.४ मिमी, म्हापसा २५.२ मिमी, पणजी २०.९ मिमी, सांगे २०.२ मिमी, केपे १२ मिमी, मडगाव ९.१ मिमी, मुरगाव ६.४ मिमी, काणकोण ३.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

आंबेगाळ कवळे येथे मोठे जुने आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले. काही काळ वाहतूक बंद झाली परंतु अग्निशमन दलाच्या जवानांकडून रस्त्यावरील झाड हटविण्यात आले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची ईजा किंवा नुकसान झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT