Goa Rainfall Deficit June Dainik Gomantak
गोवा

Goa Rainfall: पावसाची 71 टक्के विक्रमी तूट, शेवटच्या आठवड्यात तुटवडा दूर होण्याची शक्यता

Goa Rainfall Deficit June: २०१० ते २०२६ या वर्षांमध्ये २० जूनपर्यंत सर्वाधिक कमी पाऊस झालेल्या पहिल्या दोन वर्षांमध्ये २०२३ आणि चालू वर्ष यंदाच्या वर्षाचा समावेश आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्यातील २०१० ते २०२६ या कालखंडातील जून महिन्यातील पावसाच्या आकडेवारीच्या अहवालानुसार, यंदा गोव्यात १ ते २० जून या कालावधीत पावसाची विक्रमी तूट नोंदवली गेली असून हा काळ २०१० नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कोरडा काळ ठरला आहे.

२०१० ते २०२६ या वर्षांमध्ये २० जूनपर्यंत सर्वाधिक कमी पाऊस झालेल्या पहिल्या दोन वर्षांमध्ये २०२३ आणि चालू वर्ष यंदाच्या वर्षाचा समावेश आहे. राज्यातील एकंदरीत जूनच्या पावासाची आकडेवारी पाहता सर्वसामान्यपणे जूनच्या पहिल्या २० दिवसांत मोठी तूट असली, तरी महिन्याच्या शेवटच्या १० दिवसांत (२१-३० जून) पावसात मोठी सुधारणा होते, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

यंदाही शेवटच्या दहा दिवसात पाऊस मोठ्या प्रमाणात पावसाची तुट भरून काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०२३ मध्ये शेवटच्या दहा दिवसांत पावसाची तूट +४० टक्के पावसाने भरून निघाली होती आणि महिन्याअखेर ही तूट -३०% वर आली होती. २०१० आणि २०२२ मध्ये देखील जून अखेरपर्यंत पाऊसही पावसाचा असलेला तुटवडा भरून निघाला होता.

१ जून ते २० जूनपर्यंत वर्षवार पावसाचा आढावा

जूनमध्ये २० ते ५९ टक्के अधिक पाऊस पडलेले वर्ष - २०११, २०२०, २०२१, सामान्य पाऊस (१९ टक्के अधिक कमी) पडलेले वर्ष- २०१२, २०१३, २०१५, २०१७, २०१८, २०२४, २०२५. कमी पाऊस २० ते ५९ टक्के कमी पाऊस पडलेले वर्ष - २०१०, २०१४, २०१९, २०२२ ,६० टक्क्याहून कमी पावसाची नोंद - २०२३, २०२६

१९ जूनपर्यंत १६६ मिमी पाऊस

२०२३ साली राज्यात ११ जून रोजी मॉन्सूनचे आगमन झाले होते. २० जूनपर्यंत केवळ १६५ मिमी पाऊस पडला, जो नेहमीच्या सरासरीपेक्षा (५७३ मिमी) -७१% कमी होता. यंदा (२०२६) साली राज्यात ५ जून रोजी मॉन्सूनचे आगमन होऊनही १९ जूनपर्यंत केवळ १६६ मिमी पाऊस पडला आहे. ही तूट देखील सरासरीच्या -७१ टक्के एवढी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT