

पणजी: ‘अल निनो’चा प्रभाव आता प्रत्यक्षात जाणवू लागला अाहे. पुढील सात दिवस वातावरण कोरडे (पर्जन्यविरहित) असेल, असा अंदाज आज हवामान विभागाने वर्तविला आहे. मान्सूनचा वेग यंदा मंदावला असला तरीही राज्यातील धरणांमध्ये पुढील दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती जलस्रोत खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.
मात्र, राज्यातील शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यात उन्हाळ्यासारखी स्थिती आहे.
सरासरी पावसात ५० टक्क्यांची तूट
१ ते १४ जून या मान्सून हंगामात राज्यात सरासरी ३२६.२ मिमी इतक्या पावसाची नोंद होते. परंतु, यंदा मात्र या कालावधीत १६२.३ मिमी पाऊस पडला आहे. यातून यावर्षी सरासरी पावसात ५०.२ टक्क्यांची तूट असल्याचे स्पष्ट होते.
पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी भूजलसंवर्धन आवश्यक आहे. कुपनलिका असणाऱ्यांना यापुढे जलसंवर्धन सक्तीचे करण्यात येईल. तसे परिपत्रक जलसंसाधन खात्याकडून काढले जाईल. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
मान्सून रखडल्यामुळे राज्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पुढील पंधरा दिवसांत पाऊस न पडल्यास सर्वच प्रकारच्या शेतीला मोठा फटका बसणार असून, महागाईतही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. युद्धजन्य परिस्थितीसारखीच ही स्थिती भयावह असेल. - वरद सामंत, ब्रॅण्ड ॲम्बेसिडर, कृषी खाते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.