Sattari Unseasonal Rain: सत्तरीला चक्रीवादळाचा तडाखा; झाडांची पडझड, घरांचे नुकसान; वीज, पाणी व दूरसंचार सेवा ठप्प

Goa Weather Update: गुरुवारी मध्यरात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने सत्तरी तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले.
Goa Weather Update
Goa Weather UpdateDainiak Gomantak
Published on
Updated on

वाळपई: गुरुवारी मध्यरात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने सत्तरी तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही घरांवर झाडे कोसळली, तर वीजवाहिन्या तुटल्याने संपूर्ण सत्तरीतील वीजपुरवठा तब्बल १६ तास खंडित राहिला.

वादळामुळे साखळी-नावेली येथील वीज उपकेंद्रात (सबस्टेशन) बिघाड होऊन आग लागल्याने साखळी, कारापूर, हरवळे, होंडा आणि सत्तरीतील बहुतांश भाग अंधारात बुडाला. शुक्रवारी दिवसभर वीजपुरवठा बंद असल्याने मोबाईल नेटवर्क, इंटरनेट सेवा आणि पाणीपुरवठाही ठप्प झाला. उकाड्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागला.वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा पूर्ववत केला.

Goa Weather Update
Hurricane Melissa Video: 'हरीकेन हंटर्स'ची धाडसी मोहीम! मेलिसा चक्रीवादळाच्या केंद्रातून केले जीवघेणे उड्डाण; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

वाळपई अग्निशमन दलाची धावपळ

रात्रभर आणि दिवसभर वाळपई अग्निशमन दलाने विविध ठिकाणी धाव घेत झाडे हटवून रस्ते मोकळे केले आणि आपत्कालीन मदतकार्य केले. या मोहिमेत एलएफएफ अरविंद देसाई, एलएफएफ सतीश नाईक, डी. आर. देसाई, तुळशीदास झर्मेकर, प्रसाद नाईक, रूपेश म्हाऊसकर, आदित्य गावस, आनंद शेटकर, अशोक नाईक, अविनाश नार्वेकर आणि इतर जवान सहभागी झाले.

अनेक ठिकाणी झाडांची पडझड

  • वादळी वाऱ्यामुळे सत्तरीतील विविध भागांत झाडे रस्त्यावर, घरांवर आणि वीज वाहिन्यांवर कोसळली.

  • खडकी पुलाजवळ रस्त्यावर झाड पडून वाहतूक काही काळ ठप्प

  • कुडशे घुमटीजवळ रस्त्यावर झाड कोसळले

  • ब्रह्मकरमळी ब्रह्म मंदिराजवळ झाड पडले

  • तार-सावर्डे येथे झाड वीजवाहिन्यांवर पडून तीन वीज खांब कोसळले

Goa Weather Update
Ian Hurricane: अमेरिकेच्या इयान चक्रीवादळामुळे 2000 विमान उड्डाणे रद्द

वीज नसल्याने नागरिकांचे हाल

रात्रभर व दिवसभर वीजपुरवठा बंद असल्याने मोबाईल फोन डिस्चार्ज झाले, नेटवर्क सेवा खंडित झाली, इंटरनेट बंद पडले, पाणीपुरवठा ठप्प झाला,

घरांतील पंखे व उपकरणे बंद राहिली. यामुळे नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागला.

उष्णतेनंतर पावसाने दिलासा

गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे नागरिकांचे मोठे हाल झाले. शुक्रवारी दिवसभर पाऊस पडणार असे दिसत होते. मात्र, काल पडलेल्या पावसामुळे प्रचंड प्रमाणात उष्णता वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com