Goa yellow alert Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: काळजी घ्या! पाऊस पुन्हा गोव्यात, हवामान विभागाचा 'यलो अलर्ट', 6 दिवस जोरदार कोसळणार

Goa Yellow Alert: गोवा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारपासून पुढील सहा दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे

Akshata Chhatre

सारांश

  • गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर गोवा राज्यात गुरुवार, २५ तारखेपासून पुढील चार दिवसांसाठी जोरदार पाऊस अपेक्षित आहे.

  • हवामान विभागाने या पार्श्वभूमीवर राज्यभर सहा दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

  • गोव्यासोबतच महाराष्ट्र आणि कर्नाटकातही पाऊस पडण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.

पणजी: गेल्या काही दिवसांपासून गोव्यामध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, ही विश्रांती आता संपणार असून, राज्यात पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

गोवा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारपासून (ता. २५) पुढील सहा दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने गोव्यासाठी दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.

नवरात्रीच्या वातावरणात पावसाची शक्यता

सध्या राज्यात नवरात्रोत्सवाचे उत्साही वातावरण आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी राहील अशी अपेक्षा नागरिकांना होती. पण, हवामान खात्याने दिलेल्या या इशाऱ्यानंतर पुन्हा एकदा पावसाळ्यासारख्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. जर हा अंदाज खरा ठरला, तर राज्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

पर्यटकांच्या योजनांवर परिणाम

पावसाने विश्रांती घेतल्याने राज्यात पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा होती. मात्र, आता पावसाचा अंदाज खरा ठरल्यास पर्यटनाच्या योजनांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. गोव्यासोबतच महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्येही पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे, प्रवाशांनी वाहतूक आणि प्रवासाच्या योजनांबाबत अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

प्रश्न आणि उत्तरे:

प्रश्न १: गोवा राज्यात पावसाच्या जोरदार सरी कधी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे?

उत्तर: येत्या गुरुवारपासून (ता. २५) पुढील चार दिवस पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

प्रश्न २: हवामान विभागाने गोवा राज्यासाठी कोणता अलर्ट जारी केला आहे?

उत्तर: हवामान विभागाने गोवा राज्यासाठी सहा दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

प्रश्न ३: सध्या गोव्यातील कोणत्या सणाचे वातावरण आहे?

उत्तर: सध्या गोव्यातील नवरात्रीचे वातावरण आहे.

प्रश्न ४: पाऊस पडण्याची शक्यता पाहता नागरिकांना कोणती खबरदारी घेण्याची सूचना केली आहे?

उत्तर: पावसाच्या शक्यतेमुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.

प्रश्न ५: गोव्यासोबत इतर कोणकोणत्या राज्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे?

उत्तर: गोव्यासोबतच महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Assault: 'त्या मंत्र्याचे नाव जाहीर करा, कोड्यात काय बोलता...' रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात सुदिन यांचं प्रतिआव्हान

USA Cricket Board Suspended: पाकिस्तानची दाणादाण उडवणाऱ्या अमेरिका संघाला ICC चा दणका, सदस्यत्व केलं निलंबित; 'हे' ठरलं कारण

IND vs AUS: 14 वर्षांचा पोरगा बनला षटकारांचा नवा बादशाह! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; तूफानी खेळीनं उडवली कांगांरुची झोप VIDEO

SL Bhyrappa Passed Away: प्रसिद्ध कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांचे निधन; वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goa Crime: सरकारी अधिकाऱ्यावर केला जीवघेणा हल्ला, लंडनला गेला पळून; वर्षभराने संशयिताला कलकत्त्यात अटक

SCROLL FOR NEXT