Untimely Rain In Goa Dainik Gomantak
गोवा

Untimely Rain in Goa: अवकाळी पावसाची राज्यात हजेरी! विविध भागात बरसल्‍या सरी

कालपासून (सोमवार) राज्यभरात अवकाळी पावसाने आपली हजेरी लावली आहे.

Kavya Powar

Untimely Rain In Goa: कालपासून (सोमवार) राज्यभरात अवकाळी पावसाने आपली हजेरी लावली आहे. राज्‍याच्‍या विविध भागांत आज सोमवारी रात्री पावसाच्या सरी कोसळल्या. पेडणे शहरात सुमारे वीस मिनिटे मोठ्या प्रमाणात पाऊस पडून रस्त्यावर सगळीकडे बरेच पाणी झाले.

तसेच पणजी आणि शहराच्या नजीकच्या भागातही बारीक सरी कोसळल्या. इतर काही भागात मात्र तुरळक पाऊस झाला. अचानक पडलेल्या पावसामुळे दुचाकीस्वारांची धांदल उडाली व जवळच्या इमारतीत, आस्थापनांचा आश्रय घ्यावा लागला. या पावसामुळे उष्णतेपासून मात्र काही प्रमाणात दिलासा मिळाला.

मात्र यामुळे साथीचे रोग वाढले आहेत. राज्यभरात ताप आणि सर्दीचे रुग्ण वाढले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मडगावमध्ये पुन्हा डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत.

त्यातच वातावरणातील बदलांमुळे आजारांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture Ambassador: स्वयंपूर्णतेचा संदेश देणारा वरद ‘कृषिदूत’! गोवा सरकारकडून ॲम्बेसिडर म्हणून निवड; भाजी उत्पादनात प्रगतीचा ध्यास

Goa News Live: मोपा विमानतळावर सॅटेलाईट डिव्हाईस बाळगणाऱ्या रशियन नागरिकाविरोधात एका दिवसात गुन्हा आणि आरोपपत्र दाखल

Colvale Jail: गुन्‍हेगाराला ‘माणूस’ बनवणार! कोलवाळ येथे होणार अर्धमुक्त कारागृह; आराखडा बनविणे सुरू

Omkar Elephant: 'ओंकार हत्ती'वर दिवसरात्र लक्ष, लवकरच रेस्क्यू करण्यात येणार; वन विभागाचे पथक पाळतीवर

NASA Space Challenge: नासा स्पेस चॅलेंज! गोव्यातील 38 संघ सहभागी; ग्लोबल नासा हॅकेथॉन 2025 अंतर्गत पर्वरीत आयोजन

SCROLL FOR NEXT