Rainfall in the state decreased by 7 percent compared to the average Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: राज्यात पावसाचा जोर मंदावला; सरासरी तुलनेत 7 टक्क्यांनी घट

Goa Rain Update: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर मंदावला आहे. आठवड्याभरापूर्वी राज्यात सरासरीच्या तुलनेत पाऊस अधिक होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Rain Update: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर मंदावला आहे. आठवड्याभरापूर्वी राज्यात सरासरीच्या तुलनेत पाऊस अधिक होता; परंतु आता पावसाचा जोर मंदावल्याने सरासरी पावसाच्या तुलनेत पाऊस ७ टक्क्यांनी घटला आहे.

राज्यात आतापर्यंत ४९० मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र, आतापर्यंत राज्यात ४५४.९ मिमी पाऊस पडला आहे. उत्तर गोव्यात आतापर्यंत ४९७.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते; परंतु केवळ ३७९ मिमी पावसाची नोंद केली आहे. उत्तर गोव्यात सरासरी पावसाच्या तुलनेत २३.९ टक्के पाऊस कमी पडला आहे. याउलट दक्षिण गोव्यात सरासरी पावसाच्या तुलनेत ८ टक्के अधिक पाऊस पडला आहे. आतापर्यंत दक्षिण गोव्यात ४८३ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते.

आज ग्रीन अलर्ट

बुधवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून ग्रीन अलर्ट जारी केला आहे; परंतु गुरुवारपासून पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने गोवा वेधशाळेने २० ते २२ जूनपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. मागील २४ तासांत राज्यात केवळ ६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मागील २४ तासांत सर्वाधिक ३५.२ मिमी पाऊस काणकोण येथे झाला. फोंडा येथे १८.२ मिमी, पेडणे येथे १०.४ मिमी, म्हापसा ४.२ मिमी, दाबोळी ४.१ मिमी, सांगे २.१ मिमी, मडगाव २ मिमी तर साखळीत ०.२ मिमी पावसाची नोंद झाली.

नहुष कुलकर्णी, संचालक, गोवा वेधशाळा

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर मंदावला आहे; परंतु येत्या दोन-तीन दिवसांत पुन्हा राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT