Goa Rain Update : आनंदवार्ता... मॉन्सून केरळात दाखल; ४ ते ५ जूनपर्यंत गोव्‍यात

Goa Rain Update : मागील काही दिवसांपासून मॉन्‍सूनपूर्व पावसाने विश्रांती घेतल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे. आर्द्रतेतही वाढ झालेली आहे.
Goa Monsoon 2024
Goa Monsoon 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Rain Update :

अखेर आज गुरुवारी (३० मे) दक्षिण-पश्‍चिमी मॉन्सून केरळमध्‍ये दाखल झाला. तेथून चार ते पाच दिवसांत मॉन्सून गोव्यात दाखल होतो. त्यामुळे ४ ते ५ जूनपर्यंत मॉन्सून गोव्‍यात दाखल होण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांपासून मॉन्‍सूनपूर्व पावसाने विश्रांती घेतल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे. आर्द्रतेतही वाढ झालेली आहे.पुणे, देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार केरळमध्ये नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) आगमन झाल्याचे हवामान विभागाने आज जाहीर केले. केरळचा बहुतांशी भाग, तमिळनाडूच्या दक्षिण भागात मॉन्सूनने प्रगती केली आहे.

तर ईशान्य भारतात जोरदार मुसंडी मारत पूर्वोत्तर राज्यांच्या बहुतांश भागात मॉन्सून पोहोचला आहे. यंदा केरळमध्ये दोन दिवस, तर पूर्वोत्तर राज्यात सहा दिवस अगोदर मॉन्सून दाखल झाला आहे.

दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मॉन्सून साधारणत: १ जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचतो. यंदा मॉन्सून ३१ मेपर्यंत केरळमध्ये येण्याचा अंदाज होता. दीर्घकालीन सरासरीच्या दोन दिवस आधीच मॉन्सूनने देवभूमी केरळमध्ये धडक दिली आहे.

Goa Monsoon 2024
Go First कंपनीच्या विमानात बिघाड, दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या फ्लाईटची जयपूरला लॅंडींग

केरळमधील मॉन्सूनचे आगमन

वर्ष अंदाज प्रत्यक्ष आगमन

२०२० ५ जून १ जून

२०२१ ३१ मे ३ जून

२०२२ २७ मे २९ मे

२०२३ ४ जून ८ जून

२०२४ ३१ मे ३० मे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com