Chorao Ferry Dhakka gone underwater  Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: चोडण फेरी धक्का पाण्याखाली; वाहनधारकांची उडाली तारांबळ...

पावसाच्या तडाख्याने पाणी पातळीत वाढ

Akshay Nirmale

Goa Rain: परतीच्या पावसाने गोव्याला चांगलेच झोडपून काढले आहे. गेल्या २४ तासांहून अधिक काळ राज्यात पाऊस कोसळत आहे. या तुफान पावसाने राज्यात हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत, समुद्राला, नद्यांना उधाण आले आहे.

परिणामी नद्यांवर असलेल्या फेरी बोटींच्या धक्क्यांवरही पाणी आले आहे. त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.

रविवारी सकाळी रायबंदर येथील चोडण फेरी धक्क्यावर पाणी आले. चोडण बंदराकडे जाण्यासाठी येथे फेरी बोटी लागतात. तथापि, पाणी पातळीत वाढ आणि तुफान पाऊस यामुळे या परिसरात पाणी साचले आहे.

त्यामुळे फेरीतून बाहेर पडताना वाहनधारक आणि इतर प्रवाशांना गुडघ्याभर पाण्यातूनच वाट काढत जावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांची कसरत होत आहे.

फेरीबोट धक्क्याला लागल्यानंतर पासून तिथून मुख्य रस्त्यापर्यंत जाताना वाहनधारकांची तारांबळ उडत असल्याचे चित्र दिसून येत होते. सध्या धक्क्यावर बराचसा भाग पाण्याखाली गेला आहे. पावसाचा जोर असाच वाढल्यास पाणी पातळीत आणखी वाढ होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT