गोव्यात होणार TVS MotoSoul बाईकिंग फेस्टिव्हल; इंडिया बाइक वीक, रॉयल एनफिल्ड रायडर मॅनियाचेही आयोजन...

TVS MotoSoul फेस्टिव्हल एकाच वर्षात दुसऱ्यांदा
TVS MotoSoul
TVS MotoSoul Dainik Gomantak
Published on
Updated on

TVS MotoSoul Festival: TVS मोटर कंपनी आपल्या ग्राहकांसाठी यावर्षी दुसऱ्यांदा TVS MotoSoul हा बाइकिंग फेस्टिव्हल आयोजित करणार आहे. कंपनीने 8 ते 9 डिसेंबर 2023 रोजी गोव्यात हा बाइकिंग आणि म्युझिक फेस्टिव्हल होणार असल्याचे सोशल मीडियातून जाहीर केले आहे. दरमयान, याच तारखांदिवशी गोव्यात इंडिया बाइक वीक देखील होणार आहे.

हा तिसरा TVS MotoSoul फेस्टिव्हल आहे. पहिला फेस्टिव्हल 2019 मध्ये झाला होता. दुसरा फेस्टिव्हल कोरोनामुळे सतत लांबणीवर पडून याच वर्षी मार्चमध्ये झाला होता. आता तिसरा महोत्सव याच वर्षी डिसेंबरमध्ये होणार आहे.

TVS MotoSoul
Goa University: गोवा विद्यापीठात जानेवारीपर्यंत उभारणार रिसर्च पार्क; Bio-Engg मध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू करणार...

TVS MotoSoul मध्ये काय असणार?

मोटरस्पोर्ट्स, कस्टमायझेशन, बाईकिंग, म्युझिक फेस्ट असे बरेच कार्यक्रम या दोन दिवसात होतील. भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय कलाकारांचे परफॉर्मन्स होतील. गत महोत्सवात कंपनीने स्वतःचे हेल्मेट ब्लूटूथ इंटरकॉम डिव्हाइस सादर केले होते. तशा उपकरणांचे सादरीकरणही होऊ शकते.

अद्याप वेळापत्रक नाही

TVS MotoSoul टीमने आगामी कार्यक्रमाचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही, परंतु डर्ट रेस, Moto CrossFit, अडथळ्यांच्या शर्यती, तसेच TVS स्टंट रायडर्सचे स्टंट शो पाहायला मिळू शकतात.

कंपनी त्यांची नवीन उत्पादने लाँच करू शकते. ज्यात X परफॉर्मन्स इलेक्ट्रिक स्कूटर, Apache RTR 310 Streetfighter आणि Apache RTE इलेक्ट्रिक रेस बाईक यांचा समावेश आहे.

TVS MotoSoul
Goa Monsoon 2023: राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग; रस्ते जलमय; ऑरेंज अलर्ट

इंडिया बाइक वीक

दरम्यान, इंडिया बाईक वीक (India Bike Week) देखील याच काळात गोव्यात होत आहे. त्यातून विविध ब्रँडच्या बाइक प्रेमींना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. हा आशियातील सर्वात मोठा मोटरसायकल महोत्सव आहे.

रॉयल एनफिल्ड रायडर मॅनिया

याशिवाय रॉयल एनफिल्ड रायडर मॅनिया (Royal Enfield Rider Mania) हे वर्षाच्या उत्तरार्धात 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com