Agriculture Dainik Gomantak
गोवा

Goa: आठवड्याभराच्या प्रतिक्षेनंतर पाऊस सक्रिय; बळीराजा सुखावला

पावसाने अशीच कृपा करावी. अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून (Farmers) व्यक्त होत आहेत.

दैनिक गोमन्तक

डिचोली: जवळपास आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. शनिवारपासून पर्जन्यवृष्टी सुरु असून, रविवारी सकाळी आणि दुपारी काहीवेळ वगळता दिवसभर सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस बरसत होता. पाऊस सक्रिय झाल्याने मागील सात-आठ दिवस पावसाकडे डोळे लावून असलेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य उमटले असून, पावसाने अशीच कृपा करावी. अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून (Farmers) व्यक्त होत आहेत. पावसाने अशीच कृपा केल्यास येत्या आठवड्यात बहूतेक भागात लावणीची कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी दिवसभर पाऊस पडला असला, तरी पावसामुळे झाडांची पडझड वा अन्य आपत्ती ओढवलेली नाही. अशी माहिती डिचोली अग्निशमन दलाकडून मिळाली आहे.

यंदा मॉन्सूनने समाधानकारक सुरवात केल्यानंतर मागील महिन्यात वीस दिवसांपूर्वी दमदार पाऊस पडला. चार-पाच दिवस मुसळधार पाऊस पडल्यानंतर मागील आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाल्याने डिचोलीत (Bicholim) शेतीकामे खोळंबली होती. त्यामुळे पावसाच्या दमदार सुरवातीने सुखावलेला बळीराजा चिंतीत बनला होता. कधी एकदा वरूणराजा कृपादृष्टी करून पुन्हा दमदार पर्जन्यवृष्टी करणार, त्याचीच शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिली. होती. मागील महिन्यात पडलेल्या जोरदार पावसानंतर बहूतेक भागात नांगरणी आदी शेतजमिन मशागतीचे कामे पूर्ण करण्यात आली आहेत. काहीठिकाणी तरवाही लावणीसाठी तयार झाला आहे. मात्र मागील आठवड्यापासून पावसाने उघडीप केल्याने तरवा लावणीची आदी कामे करण्यात अडथळा निर्माण होऊन ही कामे लांबणीवर पडली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: कोकणी गाण्यावर आजीबाईचा तूफानी डान्स, लॉर्ड बॉबीला पाडलं फिकं; नेटकरी म्हणाले, ''आज्जी तुम्ही रॉकस्टार!"

Sarfaraz Khan: सरफराजचा 'धूमधडाका'! 19 चौकार, 9 षटकार अन् 5वी 'डबल सेंच्युरी'; हैदराबादच्या गोलंदाजांना धुतलं Watch Video

Margao: 'सोपो' शुल्कात कोणतीही वाढ नाही, जुनेच दर कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका; मडगाव पालिकेचं स्पष्टीकरण

Donald Trump: "आंदोलकांना फाशी द्याल याद राखा!" ट्रम्प यांची इराणला खुली धमकी; आखाती देशांत युद्धाचे ढग गडद Watch Video

Goa Congress Protest: काँग्रेसीचो धोल बडयत निशेद; Watch Video

SCROLL FOR NEXT