Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Railway Double Tracking: 'गोव्याच्या पर्यावरणाचा विध्वंस होणार आहे'! विरियातोंचे टीकास्त्र; बैठक घेण्याची मागणी

Viriato Fernandes: होस्पेट-हुबळी-तिनईघाट-वास्को या दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रेल्वे मंत्रालयाने आक्रमकपणे रेटण्याचे ठरविले आहे.

Sameer Panditrao

पणजी/ मडगाव: होस्पेट-हुबळी-वास्को-दा-गामा रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पामुळे उद्भवणाऱ्या गंभीर चिंतांवर चर्चा करण्यासाठी गोवा प्रदेश काँग्रेस समितीने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची तातडीने भेट देण्याची औपचारिक मागणी केली आहे. या प्रकल्पामुळे गोव्यात कोळशाची वाहतूक वाढून प्रदुषण वाढणार याकडे केंद्रीय मंत्र्यांना पाठविलेल्‍या ईमेलमध्ये लक्ष वेधले आहे.

सोमवार, १ सप्टेंबर रोजी दुपारी, गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केंद्रीय मंत्र्यांना पाठविलेल्या ईमेलमध्ये, रेल्वे मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या अलिकडच्या खुलाशांमुळे ३६३ किमीचा प्रकल्प कोळसा वाहतुकीसाठी असल्याचे पुष्टी झाले आहे.

पाटकर यांनी त्यांच्या या ईमेलमध्ये या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण आणि राज्याच्या अस्मितेवर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांबद्दल गोव्यातील लोकांमध्ये खोल चिंता निर्माण झाली आहे, असे म्हटले आहे.

गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी या प्रकरणाच्या निकडीवर भर देत, गोव्यातील विरोधी पक्षनेते, आमदार आणि दक्षिण गोव्याचे खासदार यांच्यासह, लोकांच्या चिंता मांडण्यासाठी आणि तात्काळ हस्तक्षेप करण्यासाठी अश्विनी वैष्णव यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही तुम्हाला विनंती करतो की आम्हाला लवकरात लवकर, तुमच्या सोयीच्या वेळी भेटीची वेळ द्यावी, असे या ईमेल मध्ये म्हटले आहे.

‘गोंयचो एकवोट’चा दुपदरीकरणाला विरोध

होस्पेट-हुबळी-तिनईघाट-वास्को या दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रेल्वे मंत्रालयाने आक्रमकपणे रेटण्याचे ठरविले आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला स्थानिकांकडून तीव्र विरोध होत असून, या निर्णयामुळे गोव्याच्या अस्तित्वावरच घाला घातला जात असल्याची टीका होत आहे.

‘गोंयचो एकवोट’ या संघटनेने हा प्रकल्प केवळ कोळसा वाहतूक वाढविण्यासाठीच उभारला जात असल्याचा आरोप करत, केंद्र सरकार गोवा आदानी-जिंदालसारख्या उद्योगपतींच्या ताटात वाढत आहे, अशी टीका केली. आम आदमी पक्षाच्या (वास्को युनिट) नेते अ‍ॅड. सुनील लोरान यांनीही केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या या घोषणेवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

रेल्वे मार्ग दुपदरीकरण ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अदानी उद्योग समूहाला कोळशाची वाहतूक करण्यासाठी दिलेली भेट असून त्यामुळे गोव्याच्या पर्यावरणाचा विध्वंस होणार आहे. मोदानीं सरकारचा अंत जवळ आलेला आहे आणखी काही दिवसात ते दिसून येईल.

कॅप्टन विरियातो फर्नांडिस, काँग्रेस खासदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT