Goa News | Khari KujBuj  Dainik Gomantak
गोवा

Goa News: चोर तो चोर अन् वर शिरजोर? 'खरी कुजबूज'

Goa News: गावकरवाडा - केपे येथे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जागा निश्चित केली होती, ती जागा लोकप्रतिनिधीनेच बळकावली.

दैनिक गोमन्तक

Goa News: गावकरवाडा - केपे येथे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जी जागा निश्चित केली होती, ती जागा एका लोकप्रतिनिधीनेच बळकावून तिथे बेकायदेशीर भूखंड पाडल्याचे आणि कुठलीही कायदेशीर प्रक्रिया न करता ते परस्पर परप्रांतीयांना विकल्याचे वृत प्रसिद्ध झाल्यावर त्या लोकप्रतिनिधीचे म्हणे धाबे दणाणले आहेत.

सध्या म्हणे तो हे वृत्त छापून आणणाऱ्या बातमीदाराच्या नावाने शंख फोडू लागला आहे. मनातून जरी तो घाबरलेला असला, तरी उसना आवेश आणत त्या वृत्त प्रतिनिधींना चौदावे रत्न दाखविण्याची भाषा करू लागला आहे. त्याचे हे वागणे पाहिल्यास चोर तो चोर आणि वर शिरजोर अशातली ही गोष्ट झाली नाही का?

स्टिअरिंग हातात घेण्याची होती तयारी...

म्हापसा पालिका कर्मचारीवर्ग संपावर गेल्याने पालिका मंडळासमोर शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न होता. त्यामुळे कामगार मिळाले नाहीत, तर नगरसेवकांनी ज्यांना ट्रक चालवता येतो, त्यांनी कचरावाहू ट्रकचे स्टिअरिंग हातात घेण्याचे ठरविले होते. हा पालिका मंडळाच्या व्यूहरचनेचा एक भाग होता.

मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत पालिका कर्मचारीवर्गाने आपला संप ३१ ऑक्टोबरपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. शिवाय रोजंदारी कामगारांकडून शुक्रवारी कचरा संकलनाचे काम करून घेण्यात आले. त्यामुळे या रणनीतीची अंमलबजावणी करण्याची वेळ या लोकप्रतिनिधींवर ओढवली नाही, एवढे मात्र नक्की.

फॅशन शोची क्रेझ

उत्तर गोवा लेखा विभागातील कर्मचाऱ्यांनी आपली फॅशन शोची हौस भागवून घेतली. पारंपरिक धोतर, सदरा, टोपी, उपरणे असा पुरुषांचा, तर महिला कर्मचाऱ्यांनी खादीच्या काश्टा नेसलेली साडी आणि अलंकाराने सजलेला गळा असा पेहराव केला होता. सध्या या फॅशन शोमधील रॅम्पवॉकची छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहेत आणि त्यावर मजेशीर कमेंटही येऊ लागल्या आहेत. ∙∙∙

शिष्टाचाराचे वाभाडे

भाजपातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समजणाऱ्या माविन गुदिन्हो यांच्याकडे शिष्टाचार मंत्रिपद दिले आहे. त्यामुळे गुदिन्हो यांना अनेक चाकोरीबद्ध नियमात वावरावे लागते. सरकारने नुकताच ‘मंत्री तुमच्या दारी’ हा उपक्रम राबविला. त्यांच्याकडे काणकोण तालुक्यात जाण्याची वेळ आली.

14 ऑक्टोबरला त्यांचा हा दौरा होता, परंतु ते गेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या खात्याने 17 रोजी दौरा निश्‍चित केला. मात्र, तरीही त्या दिवशी पोचले नाहीत. अखेर खात्याने आज 21 रोजी पुन्हा एकदा गुदिन्होंना काणकोणचा दौरा करण्याचे निश्‍चित केले.

विशेष म्हणजे त्यांच्या संबंधित खात्याने त्यांच्या दौऱ्याची तयारी केली होती. हारतुरे, अल्पोपहार याचाही बेत आखण्यात आला होता, परंतु गुदिन्हो यांनी तिसऱ्यांदाही काणकोणवासीयांनी टांग दाखविली. त्यांनी अनुपस्थित राहण्याची हॅट्‍ट्रीक साधल्याने हाच का तो शिष्टाचार असा प्रश्‍न लोकांना पडलाच असेल.

...आणि माविन भडकले

रस्ता वाहतूक सुरक्षा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी घेण्यात आलेल्या जनसुनावणीवेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो मार्गदर्शन करण्यास उभे राहिले. मात्र, काही उपस्थितांनी आरोळ्या घालण्यास सुरवात केली आणि मंत्र्यांच्या भाषणात व्यत्यय आणला. नेमके काय झाले कोणालाच काही समजेना.

कोण म्हणाले टॅक्सीवाले आलेत, तर कोण म्हणाले ते नेहमीचेच व्यत्ययवाले. माविन मात्र भलतेच भडकले. आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न न करण्याचा इशारा त्यांनी दिला. गोंयकारांच्या भल्यासाठी भाजप सरकार योग्य तेच करणार असे ते ठामपणे म्हणाले. कार्यक्रमाला आधीच उशीर झालेला. सूचना देण्यास आलेले लोक बराच वेळ ताटकळत होते.

मंत्र्यांचे भाषण संपत नव्हते. पुरे आता बसा खाली असे तोंड लपवून ओरडणारा सर्वांची करमणूक करत होता. मंत्र्यांनी कडक पवित्रा घेतल्यावर मात्र सगळे शांत झाले. माविनना म्हणे हल्ली सर्वत्र टॅक्सीवालेच दिसतात असे सभागृहात आपसांत बोलले जात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT