Goa News
Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: केपेत फळबागायती जागेत भूखंड विक्री; स्‍थानिकांचा संताप!

दैनिक गोमन्तक

Goa News: गावकरवाडा-केपे येथील फळबागायतीच्या जागेत परप्रांतीय लोकांना भूखंड विक्री करण्‍यात आल्‍याचा विषय सध्‍या बराच गाजत आहे. स्‍थानिकांनी या जागेत उभी राहत असलेल्या घरांना आपला विरोध दर्शविला असून ही घरे पाडून टाकावीत अशी मागणी केली आहे.

दिल्लीस्थित सरबायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने गावकरवाडा येथील सदर जागा घेतली असून याच जागेवर केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेखाली सुमारे 1100 फ्लॅट्स उभे राहणार होते. पण या प्रकल्पाला आपण नगराध्यक्ष असताना आपल्यासह बऱ्याच नगरसेवकांनी विरोध केला होता असे नगरसेवक फिलू डिकॉस्‍टा यांनी सांगितले.

गावकरवाडा हा एक छोटासा गाव. तेथे एवढा मोठा प्रकल्प राबविला तर अचानक लोकसंख्‍या वाढेल. त्‍यामुळेच आमचा या प्रकल्‍पाला विरोध असल्‍याचे डिकॉस्‍टा यांनी सांगितले. सदर प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर कंपनीने आपला गाशा गुंडाळला होता. पण त्यांनी केपे भागातील दोघांना हाताशी धरून त्या जमिनीत भूखंड तयार करून विकण्याचे कारस्थान केल्याने आम्ही प्रकल्पाला विरोध करून काहीच फायदा झाला नाही.

कर्नाटकातील लोकांना सदर भूखंड विकले गेल्याने स्‍थानिकांनी संताप व्यक्त केला असून सध्या काही बांधलेली काही बेकायदेशीर घरे मोडून टाकावीत अशी मागणी सदर जागेवर हक्क सांगणाऱ्या वृंदा कंटक यांनी केली आहे. त्‍यांनी आपल्या वकिलामार्फत केपे पालिकेला निवेदन सादर केलेले आहे. पालिका कोणत्याही क्षणी या बांधकामांवर कारवाई करू शकते, असे पालिका अभियंता नितीन कोठारकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

Cancer News : फुफ्फुसाच्या कर्करोगाची गोमेकॉत साधनसुविधा

IRCTC Goa Tour Package: आयआरसीटीसीचं ‘गोवा टूर पॅकेज’! मिळेल सर्व काही बजेटमध्ये; जाणून घ्या डिटेल्स

MLA Disqualification: लक्षात आहे ना? अपात्रता याचिकेबाबत अमित पाटकरांचे सभापतींना स्मरणपत्र

SCROLL FOR NEXT