Goa Government | Souza Lobo Restaurant
Goa Government | Souza Lobo RestaurantDainik Gomantak

Goa Government: 'सौझा लोबो बार' बाबत वारंवार सतावणूक- जुआन लोबो

Goa Government: सरकारच्या GCZMA कडून सौझा लोबो बार आणि रेस्टॉरंटबाबतीत कुटुंबीयांची वारंवार सतावणूक होत असल्याचे लोबो यांनी सांगितले.
Published on

Goa Government: सरकारच्या जीसीझेडएमए प्राधिकरणाकडून पोर्तुगीज काळापासून कळंगुट किनाऱ्यावर कार्यरत असलेल्या सौझा लोबो बार व रेस्टॉरंट पाडण्याचा इशारा देण्याबरोबरच अर्धवट कागदपत्रांच्या आधारे आपली व आपल्या कुटुंबीयांची वारंवार सतावणूक करण्यात येत असल्याचे जुआन सौझा लोबो यांनी बुधवारी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

सौझा लोबो रेस्टॉरंट 1932 पासून या भागात कार्यरत असून त्याकाळी गोव्यात पोर्तुगीज सत्ता होती. त्यावेळी सीआरझेड कायदा गोव्यात अस्तित्वात नव्हता. त्यामुळे रेस्टॉरंट बेकायदा नाही, सीआरझेड कायदा गोवा मुक्तीनंतर राज्यात लागू करण्यात आलेला असून आपले रेस्टॉरंट त्या कायद्याच्या कचाट्यात येत नाही, असे लोबो म्हणाले.

Goa Government | Souza Lobo Restaurant
Goa News: म्हापशातील कोमुनिदाद प्रशासक इमारत नादुरुस्त

आपल्या रेस्टॉरंटच्या शेजारी हल्लीच उभारण्यात आलेल्या रेस्टॉरंटच्या चालक श्रीमती आरोरा या परप्रांतीय महिलेच्या तक्रारीवरून जीसीझेडएमएचे अधिकारी विनाकारण आपल्याला सतावत आहेत. आपल्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका असल्याचेही श्रीमती जुआन लोबो यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रकरणात विशेष लक्ष घालून आपल्याला सुरक्षा आणि न्याय मिळवून द्यावा, असेही लोबो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com