Goa River: म्हापसा नदीपात्र पुन्हा जलपर्णीने व्यापले!

Goa River: जलस्त्रोत खाते तसेच संबंधित यंत्रणेने वेळीच उपाययोजना न केल्यास नदीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो.
Goa Mapusa River
Goa Mapusa RiverDainik Gomantak

Goa River: म्हापसा येथील नदीपात्रात पुन्हा एकदा जलपर्णी झपाट्याने वाढू लागली आहे. यावर जलस्त्रोत खाते तसेच संबंधित यंत्रणेने वेळीच उपाययोजना न केल्यास नदीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. मध्यंतरी ही जलपर्णी यंत्रसामग्रीने साफ करण्यात आली होती.

मात्र पुन्हा मोठ्या प्रमाणात जलपर्णी यायला सुरुवात झाली आहे. ही जलपर्णी अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर कशी आली याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. म्हापसा नदीत, गिरी ते मयडे पुलादरम्यान गेल्या काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली होती. या जलपर्णीच्या झालरमुळे या नदीचे पात्र अदृश्य बनले होते.

Goa Mapusa River
Donapaula Jetty: दोना पावला जेटीचे काम पूर्ण; एक डिसेंबरला होणार सुरू

स्थानिक तसेच मच्छीमारांनी वेळोवेळी म्हापसा पालिका मंडळ, बस्तोडा व गिरी पंचायत तसेच जलस्त्रोत व बंदर कप्तान खाते आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधल्यामुळे शेवटी म्हापसा पालिका आणि मयडे भागातील काही सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांमुळे जलस्त्रोत खात्याने ही जलपर्णी हटविण्याचे काम हाती घेतले होते. त्‍यामुळे लोकांनी समाधान व्‍यक्त केले होते.

...म्‍हणून पुन्‍हा अवतरली जलपर्णी?

सध्या नदीतील तार पुलाच्या दोन्ही बाजूने ही जलपर्णी वाहून जाताना तसेच नदीच्‍या पात्रात अडकलेली दिसत आहे. या वनस्पतीचा ओघ वाढण्यापूर्वी त्यावर तोडगा न काढल्यास पुन्‍हा अगोदरची स्‍थिती निर्माण होईल, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

गेल्या जून-जुलै महिन्‍यात जलस्त्रोत खात्याने विशेष यंत्राच्‍या साहाय्याने ही जलपर्णी नदीपात्रातून काढली होती. मात्र त्यावेळी जलपर्णीचे समूळ नष्ट केले गेले नाही. त्यामुळे कदाचित पुन्हा या जलपर्णीने डोके वर काढल्याचे दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com