Goa PWD Scam Dainik Gomantak
गोवा

Goa PWD Scam: सार्वजनिक बांधकाम विभागात 1000 कोटींचा निविदा घोटाळा? बनावट कागदपत्रांच्या आधारे कंत्राट मिळवल्याचा आरोप

Goa PWD Corruption Scandal: गोव्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) सुमारे 1000 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला.

Manish Jadhav

पणजी: गोव्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) सुमारे 1000 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला. या प्रकरणामुळे संपूर्ण विभागात खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकारी आणि बड्या कंत्राटदार कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. कंत्राट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याच्या तक्रारीनंतर आता हे प्रकरण भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे (ACB) पोहोचले.

स्थापत्य अभियंता आणि कंत्राटदार मनोज एस. पै डुकले यांनी या संदर्भात अधिकृत तक्रार दाखल केली. त्यांच्या दाव्यानुसार, 'बगकिया कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीने कंत्राटदार श्रेणीत वरचे स्थान मिळवण्यासाठी कामाच्या पूर्ततेची खोटी प्रमाणपत्रे सादर केली. तसेच, 'जॉइंट व्हेंचर'च्या (JV) नोंदींमध्ये फेरफार करुन दिशाभूल करणारी माहिती दिली, असा आरोप डुकले यांनी केला. या बोगस कागदपत्रांच्या जोरावर कंपनीने कोट्यवधींच्या निविदा पदरात पाडून घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या तक्रारीत केवळ कंपनीलाच नव्हे, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. नियमावली स्पष्ट असतानाही अधिकाऱ्यांनी या कागदपत्रांची पडताळणी का केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे प्रकरण आता दक्षता विभागाच्या (Vigilance) भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखेकडे सोपवण्यात आले. दुसरीकडे, संबंधित कंपनीने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून कोणत्याही चौकशीला सहकार्य करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT