Goa Minister Fined Twice  Dainik Gomantak
गोवा

Goa Minister Fined Twice: भरधाव वेगाने गाडी चालवणं गोव्याच्या 'या' मंत्र्याला पडलं महागात

वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याची मंत्र्याचीही कबुली, दंडही भरणार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Minister Fined Twice: गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांना भरधाव वेगाने गाडी चालविल्याबद्दल चक्क दोन वेळा दंड करण्यात आला आहे. सीसीटीव्हीद्वारे ऑटोमेटिक चलन यंत्रणेतून मंत्री काब्राल यांना दोन वेळा असा दंड करण्यात आला आहे.

याबाबत बोलताना काब्राल म्हणाले की, मला भरधाव गाडी चालवल्याबद्दल दोन चलन मिळाली आहे. मी वेगमर्यादेचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे मला दंड भरावा लागणार आहे. जेव्हा तुम्हाला चांगले रस्ते मिळतात तेव्हा तुम्ही वेगाने जात असता. 100 किलोमीटर प्रतीतास वेग असलेल्या रस्त्यावर मी वेगमर्यादेचे उल्लंघन केले. मी तेव्हा 103 किलोमीटर प्रतीतास वेगाने गाडी चालवत होतो.

रस्ते वाहतुकीली शिस्त लागण्यासाठी सीसीटीव्ही गरजेचे आहे. हे कामाचे आऊटसोर्सिंग केले जाईल, कारण त्याची देखभाल दुरूस्ती चांगली ठेवली जाते. किमान महामार्गावर तरी कॅमेरे लावले पाहिजेत. त्यासाठी ऑटोमेटिक चलन आऊटसोर्स करण्याबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. अपघातात घट होणे हे चांगलेच आहे. जनतेच्या मदतीनेच उपाययोजना यशस्वी होतील. दुचाकीस्वारांनीही गाडी चालवताना काळजी घ्यावी.

रस्त्यातील खड्ड्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, रस्त्यातील खड्ड्यांसाठी अॅप लाँच केले आहे. हे अॅप पुढील महिन्यापासून लोकांना वापरण्यासाठी खुले केले जाईल. या अॅपवर जशी माहिती मिळेल तसे अधिकारी त्यावर कार्यवाही करत आहेत. खड्डे भरले जात आहेत, रस्ते दुरूस्ती केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT