Section 39 A TCP Act Goa Section 39 A TCP Act Goa
गोवा

'करो या मरो' महाआंदोलनाची हाक, पणजीत '39-ए' विरोधात लढा; विरोधकांकडून जनतेला सहभागाचे आवाहन

Section 39 A TCP Act Goa: आझाद मैदानात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली. तत्‍पूर्वी आज सकाळपासून आझाद मैदानावर बोरकर यांचे आंदोलन सुरू राहिले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी : नगरनियोजन कायदा कलम ‘३९-ए’ रद्द करण्‍याची मागणी तसेच आमदार वीरेश बोरकर यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी करूनही ती दुर्लक्षित राहिल्‍याने उपोषणकर्ते व विरोधी नेत्यांनी उद्या (सोमवारी) सायंकाळी ४ वाजता ‘करो या मरो’ महाआंदोलन छेडले आहे.

त्‍यासाठी जनतेला सहभागाचे आवाहन करण्‍यात आले आहे. सायंकाळी आझाद मैदानात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली. तत्‍पूर्वी आज सकाळपासून आझाद मैदानावर बोरकर यांचे आंदोलन सुरू राहिले. सामान्‍य नागरिक, नेत्‍यांनी त्‍यांना जबरदस्‍त प्रतिसाद दिला आणि आपली मते व्‍यक्‍त केली. विरोधी पक्षांनी एकत्र येण्‍याची गरज व्‍यक्‍त करण्‍यात आली.

यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्ता, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, आम आदमी पक्षाचे आमदार व्हेन्झी व्हिएगस, आमदार क्रूझ सिल्वा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे मनोज परब, डॉ. ऑस्कर रिबेलो, मनीषा उसगावकर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

जाती-धर्मांच्या पलीकडे मतदान करा!

डॉ. ऑस्कर रिबेलो म्हणाले, मतदार निवडणुकीवेळी जात आणि धर्माच्या आधारे मतदान करण्याची चूक करतात. त्याचा त्रास पुढे होतो, हे समाजाने लक्षात घेणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी राज्याच्या भूमीचे आणि हिताचे रक्षण करण्याची गरज यावर भर दिला. त्याचबरोबर काँग्रेसने जनतेचा विश्वासघात केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

आमदार वीरेश बोरकर हे लोकांसाठी लढा देत आहेत. त्यांच्यासोबत जनतेने आणि सर्व राजकीय पक्षांनी आपापसांतील मतभेद विसरून एकत्र यावे. हा लढा कोणा एकाचा नाही. त्यामुळे राज्यातील सर्व जनतेने या आंदोलनात सहभागी होऊन त्यांना पाठिंबा द्यावा.

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.

बाणावलीवासीयांनाही आवाहन

पत्रकार परिषदेत आमदार व्हेन्झी व्हिएगस म्हणाले, बाणावली मतदारसंघातील लोकांनी बाहेर पडावे आणि आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मी करीत आहे. त्याचबरोबर आसपासच्या मतदारसंघांमधील लोकांनीही बसेस करून यावे. माझ्या मतदारसंघातील टॅक्सीचालक, तसेच युवकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

‘३९-ए’ रद्दचा प्रश्नच नाही

नगरनियोजन कायदा कलम ‘३९-ए’वरून तीव्र आंदोलन सुरू आहे; परंतु हे विधेयक रद्द करण्याची शक्यता नाही, असे कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी म्हटले आहे. टीसीपी बोर्डाचे सदस्य असलेले फळदेसाई म्हणाले, की मी या विषयावर सरकारच्या भूमिकेचे समर्थन करतो. ‘प्रादेशिक आराखडा २०२१’मध्ये जमिनीचे झोन बदलण्याची परवानगी देणाऱ्या टीसीपी कायद्याच्या वादग्रस्त कलमाविरुद्ध निदर्शने करणाऱ्या आंदोलकांकडून त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र टीका झाली आहे. दरम्‍यान, फळदेसाई यांच्‍या वक्‍तव्‍यानंतर युरी आलेमाव यांनी त्‍यांचा खरपूस समाचार घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT