Goa: राष्ट्रीय बजरंग दलाचे महाराष्ट्र व कोंकण प्रांत कार्यवाह दिनेश पाटिल सोबत प्रा. सुभाष वेलिंगकर Dainik Gomantak
गोवा

Goa: 'हिंदु रक्षा दल' हे 'राष्ट्रीय बजरंग दला'त विसर्जित करण्याच्या प्रस्तावाला अनुकूलता

राष्ट्रीय बजरंग दलाचे दिनेश पाटिल यांच्या समवेत हिंदु रक्षा दलाच्या कार्यकारिणीची सहमतीच्या दृष्टीने फोंडा येथे बैठक

Dainik Gomantak

Goa: 'भारतमाता की जय' (Bharat Mata ki Jay) या संघटनेने हिंदुसमाज रक्षणार्थ निर्माण केलेले 'हिंदु रक्षा दल' (Hindu Raksha Dal) हे नितीन फळदेसाई (Nitin Faldesai) यांच्या नेतृत्वाखाली युनिट 'राष्ट्रीय बजरंग दला'त (Rashtriy Bajrang Dal) विसर्जित करण्याच्या प्रस्तावावर 'भारत माता की जय' संघटनेने अनुकुलता दर्शवली आहे. 'भारत माता की जय' संघटनेचे संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर (Prof. Subhash Velingkar) यांनी पत्रकातून दिलेल्या माहितीनुसार राज्य कार्यवाह प्रा.प्रविण नेसवणकर, व्यवस्थाप्रमुख सूर्यकांत गावस, राज्य सदस्य विनायक च्यारी व नितीन फळदेसाई यांच्या उपस्थितीत या विषयावर चर्चा होऊन, प्रस्तावास अनुकुलता व्यक्त करण्यात आली.

विश्व हिंदुपरिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष व आताचे आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रविणभाई तोगाडिया यांच्या सूचनेवरून, या संघटनेचे महाराष्ट्र व कोंकण प्रांताचे कार्यवाह दिनेश पाटिल यांनी आज, भारतमाता की जय संघ, गोवा चे राज्य संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांची त्यांच्या पणजी येथील निवासस्थानी भेट घेतली. राष्ट्रीय बजरंग दलाची स्थापना गोव्यात करण्याच्या दृष्टीने ही भेट होती.

भारतमाता की जय चे हिंदुसमाज रक्षणार्थ निर्माण केलेले " हिंदु रक्षा दल" राष्ट्रीय बजरंग दलात विसर्जित करण्याच्या प्रस्तावावर यावेळी चर्चा झाली. दिनेश पाटिल (Dinesh Patil) यांच्या समवेत हिंदु रक्षा दलाच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक सहमतीच्या दृष्टीने फोंडा येथे घेण्यात आली. अशी माहिती प्रा. वेलिंगकर. यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT