Goa: रायबंदर येथे आरोग्य केंद्रासाठी प्रक्रिया सुरु

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली महत्वपूर्ण मिरामार बैठक
Goa Health minister Vishwajit Rane
Goa Health minister Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: रायबंदर (Ribandar) येथे प्राथिमिक आरोग्य केंद्र (Primary Health Center) स्थापन करण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. काल आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे (Health minister Vishwajit Rane) यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक मिरामार येथे झाली. या बैठकीला आरोग्य संचालक डॉ. जुझे डिसा, गोवा वैद्यकिय महाविद्यालये (GMC) डीन डॉ. शिवानंद बादेकर व इतर आरोग्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी या वर्षाच्या शेवटापर्यंत रायबंदर येथे आरोग्य केंद्र स्थापन करण्यासाठी एक समिती गठीत करण्याची सुचना आरोग्यमंत्री राणे यांनी आरोग्य संचालक डॉ.डिसा यांना केली. तसेच आरोग्य केंद्रासाठी गरज असलेल्या उपकरणाची यादी तयार करुन ती मंजुरीसाठी पाठवण्याचे निर्देश दिले.

Goa Health minister Vishwajit Rane
Goa: विद्यार्थ्यांना पालकांना लाज वाटेल असे वर्तन करु नये

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या प्रयत्नानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रायबंदर येथील जुन्या गोमेकॉ इमारतीत आरोग्य केंद्र सुरु करण्याचे आश्‍वासन आमदार मोन्सेरात यांना दिले होते. तसेच त्यांनी आमदार मोन्सेरातसह या जागेची पहणी काही दिवसापुर्वी केली होती. त्यावेळी १९ डिसेंबर या गोवा मुक्तदिनी या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन करण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यानी व्यक्त केला होता. काल आरोग्य मंत्र्यानी सदर तारीख लक्षात घेऊन कामाचा वेग वाढवण्याचे निर्देश आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fire Safety Training In Goa
 Anmod Forest Murder Case
Jan Dhan Accounts In Goa
Goa Water Metro
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com