Goa News | Dr. Divya Rane Dainik Gomantak
गोवा

Goa News: जिल्हा खनिज निधी वापराविना- दिव्या राणे

Goa News: खनिजग्रस्त भागांसाठी वापरला जाणारा कोट्यवधी रुपयांचा जिल्हा खनिज निधी पडून आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: खनिजग्रस्त भागांसाठी वापरला जाणारा कोट्यवधी रुपयांचा जिल्हा खनिज निधी (डीएमएफ) पडून आहे. यासाठी नवे प्रकल्प सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार नवे प्रकल्प सादर केले जातील, अशी माहिती पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी दिली आहे.

खाणी सुरु असताना खनिज रॉयल्टीपोटी जमा झालेला कोट्यवधी रुपयांचा जिल्हा खनिज निधी अनेक दिवसांपासून वापराविना पडून आहे. कोट्यवधी रुपयांचा हा निधी प्रामुख्याने संबंधित भागात पिण्याचे पाणी प्रकल्प, शाळा उभारणी खाणग्रस्त भागातील मूलभूत साधनसुविधा प्रकल्पांसाठी वापरता येतो.

यासंबंधीचा विनियोग आणि मूल्यांकन करणारी बैठक जिल्हाधिकारी मामू हगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याबाबत डॉ. राणे म्हणाल्या, कोविड काळात सुरू केलेले प्रकल्प विविध कारणांनी रेंगाळले आहेत किंवा ते रद्द करण्यात आले आहेत.

नव्याने अशा प्रकल्पात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी हगे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार आता खाण क्षेत्रातील गावांचे सरपंच, पंच यांना विश्वासात घेऊन आमच्या परिसरातील प्रकल्प सादर करण्यात येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT