Goa kala Academy: कला अकादमी नूतनीकरणाचे काम डिसेंबरपर्यंत होणार पूर्ण

Goa kala Academy: राज्यभर चर्चेत असलेल्या कला अकादमीचे काम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल.
Goa Kala Academy
Goa Kala Academy Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa kala Academy: राज्यभर चर्चेत असलेल्या कला अकादमीचे काम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल आणि त्या दरम्यानच नूतनीकरणाच्या कामाचे उद्‌घाटन होईल. तत्पूर्वी इफ्फीपर्यंत मुख्य सभागृह वगळता इतर परिसर सर्वांसाठी खुला होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्या उपस्थित विविध खात्यांच्या पदाधिकाऱ्यांसह कला अकादमीच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते. कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम निविदा न काढता मंत्रिमंडळाच्या मान्यतेने प्राधान्यक्रमाने दिले आहे.

Goa Kala Academy
CM pramod sawant: 'या' तारखेपर्यंत कला अकादमी गोवेकरांसाठी असेल सज्ज

यावरून विरोधकांनी विधानसभेत आणि सभागृहाच्या बाहेर आवाज उठवला होता. याबाबत काहीजण दक्षता आयोगाकडेही गेले आहेत. 39.4 कोटींच्या या कामाला विविध करांसह साधारणपणे 56 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू असून अनेक कामगार विविध विभागात काम करत आहेत. हे काम याच गतीने झाल्यास 20 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे इफ्फीपर्यंत मुख्य सभागृह वगळता इतर परिसर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलसाठी वापरता येईल, असा मुख्यमंत्र्यांचा अंदाज आहे.

Goa Kala Academy
Goa Government: नियमांची अंमलबजावणी मंत्र्यांपासूनच सुरु व्हावी!

‘आयुर्वेद काँग्रेस कला अकादमीतच’

8 ते 11 डिसेंबर दरम्यान कला अकादमीमध्ये जागतिक आयुर्वेद काँग्रेसचे आयोजन केले आहे. त्यामुळे यासाठी कला अकादमी तयार होणे गरजेचे आहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, जागतिक आयुर्वेद काँग्रेस कला अकादमीमध्येच होईल आणि तत्पूर्वी कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com