Goa Professional Football League 2023 
गोवा

Goa Professional Football League: नवोदित कुठ्ठाळी व्हिलेजर्सने धेंपोला झुंजविले, क्लबचा 2-1 फरकाने निसटता विजय

धेंपो क्लबचा नेसियो फर्नांडिस सामन्याचा मानकरी ठरला.

किशोर पेटकर

Goa Professional Football League: गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या कुठ्ठाळी व्हिलेजर्सने मंगळवारी गतविजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबला चांगलेच झुंजविले. मोसमाच्या सुरवातील मदतनिधी सामना जिंकलेल्या संघाने अखेर अनुभवाच्या बळावर 2-1 असा निसटता विजय प्राप्त केला.

सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. स्पर्धेतील पहिलाच सामना खेळणाऱ्या कुठ्ठाळी व्हिलेजर्सने धेंपो क्लबचा चांगलेच जेरीस आणले. निर्धारित 90 मिनिटांच्या खेळात त्यांनी धेंपो क्लबला गोल करू दिला नाही. सामन्यातील तिन्ही गोल इंज्युरी टाईम खेळात झाले. धेंपो क्लबचा नेसियो फर्नांडिस सामन्याचा मानकरी ठरला.

भरपाई वेळेत अगोदर धेंपो क्लबने आघाडी घेतली. आर्नोल्ड ऑलिव्हेरा याच्या सणसणीत फ्रीकिकवर प्रतीक नाईक याचे हेडिंग अचूक ठरले. लगेच एका ताकदवान फटक्यावर नेसियो फर्नांडिस याने गतविजेत्या संघाची आघाडी 2-0 अशी वाढविली. त्यानंतर धेंपो क्लबच्या सैरॉन आल्बुकर्क याच्या स्वयंगोलमुळे कुठ्ठाळीच्या संघाची पिछाडी 1-2 अशी कमी झाली, मात्र नंतर पुरेसा वेळ नसल्यामुळे नवोदित संघाला बरोबरीची संधी मिळाली नाही.

स्पर्धेत बुधवारी (ता.30) धुळेर-म्हापसा स्टेडियमवर कळंगुट असोसिएशन व पणजी फुटबॉलर्स यांच्यात सामना खेळला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT