Goa Private Bus Operators Dainik Gomantak
गोवा

Goa Private Bus Operators: खासगी बसचालकांच्या मागण्यांवर अखेर हालचाली झाल्या सुरू; अनुदान, ई-बस परवान्यांबाबत कार्यवाही

E Bus Permit Goa: राज्यातील खासगी बस चालकांनी मांडलेल्या अनेक प्रलंबित मागण्यांवर राज्य परिवहन खात्याने कार्यवाही सुरू केली असल्याचे आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांना कळविले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यातील खासगी बस चालकांनी मांडलेल्या अनेक प्रलंबित मागण्यांवर राज्य परिवहन खात्याने कार्यवाही सुरू केली असल्याचे आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांना कळविले आहे.

परिवहन संचालक अरविंद बी. खुटकर यांची एका पत्राद्वारे विभागाने ताम्हणकर यांनी गेल्या तीन वर्षांत सादर केलेल्या निवेदनांवर सविस्तर स्थिती अहवाल दिला आहे. बस चालकांच्या मागण्यांचे निराकरण न झाल्याचा आरोप करत ताम्हणकर यांनी २२ जून रोजी कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर परिवहन खात्याकडून हा प्रतिसाद मिळाला आहे.

व्यावसायिक वाहन चालकांकडून मद्यपान करून वाहन चालवल्यास त्यांच्यावर पोलिसांमार्फत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच इलेक्ट्रिक बसेससाठी ''स्टेज कॅरेज'' परवाने लागू करण्याबाबतचा प्रस्ताव ''रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे'' पाठविला आहे, त्याबाबत स्पष्टीकरण मिळेपर्यंत तो प्रलंबित राहील.

गोव्याबाहेर नोंदणीकृत असूनही विहित कालावधीपेक्षा जास्त काळ राज्यात चालणाऱ्या वाहनांवर, तसेच कर वसुलीसाठी पात्र असलेल्या ''बीएच-सीरीज''च्या वाहनांवर कारवाईचे निर्देश दिल्याचेही खुटकर यांनी पत्रात म्हटले आहे.

''माझी बस योजना'' आणि संबंधित अनुदानाच्या बाबींच्या अंमलबजावणीसाठी एक स्वतंत्र अनुदान विभाग स्थापन करण्यात आल्याचे नमूद केले आहे. याशिवाय इंधन अनुदानाचे अनेक प्रलंबित दावे आणि आर्थिक मदतीचे प्रस्ताव यांवर आधीच प्रक्रिया पूर्ण झाली असून, ते वित्त विभागाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

त्याशिवाय विभागाने स्पष्ट केले आहे की, संघटनेच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेली निवेदने अद्याप विचाराधीन आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT