

डिचोली: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी डिचोली तालुक्यात पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील दोन ठिकाणी झाडे कोसळली. या घटनांमध्ये मोठी जीवितहानी टळली; मात्र लाडफे येथे एका घराच्या छपरावरील कौले फुटून नुकसान झाले.
सायंकाळी लाडफे येथील समीर मळीक यांच्या घराशेजारील सागवानाचे झाड कोसळले. झाड घराच्या छपरावर पडल्याने कौले फुटून घराचे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. लीडिंग फायर फायटर व्ही. एम. गाड यांच्या नेतृत्वाखाली गीतेश नाईक (चालक-ऑपरेटर), सुनील गावस, सागर कुंकळेकर आणि आशिष मोर्लेकर यांनी झाड हटवून परिसर सुरक्षित केला.
दुसरी घटना उसप येथे घडली. भररस्त्यात भलेमोठे झाड कोसळल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. लीडिंग फायर फायटर व्ही. डी. गावकर यांच्या नेतृत्वाखाली संदीप परब (चालक-ऑपरेटर), संजय उसपकर, संदीप गावस आणि सतीश डेगवेकर यांनी तत्काळ मदतकार्य करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
गृहिणींची कसरत
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. मात्र रविवारी दुपारनंतर आणि सायंकाळी पुन्हा जोरदार पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
सायंकाळी झालेल्या पावसामुळे डिचोली बाजारात वटपौर्णिमेनिमित्त खरेदीसाठी आलेल्या गृहिणींना मोठी कसरत करावी लागली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.