Goa Weather Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: लाखोंचे आर्थिक नुकसान! मुसळधार पावसामुळे घरे-झाडांवर संक्रांत, वाहनांची हानी, वीज खात्यालाही मोठा फटका

Goa pre-monsoon storm: चक्रीय वारा आणि मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटनांत वाढ झाली आहे. दरडी कोसळणे, झाडे पडून दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे नुकसान झाले.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात मागील दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाचे धुमशान सुरूच असून वादळी वाऱ्यासह कोसळधारा कायम आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी वाहने, घरांवर झाडे पडून आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

चक्रीय वारा आणि मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटनांत वाढ झाली आहे. दरडी कोसळणे, झाडे पडून दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. सावईवेरे येथे एका घरावर झाड कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घरातील महिलेला दुखापत झाली असून तिला तात्काळ इस्पितळात दाखल केले आहे. राज्यात शुक्रवारी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवत हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

वादळी वाऱ्याचा धोका!

कोकण-गोवा किनाऱ्यावरील पूर्वमध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन पुढील ३६ तासांत चक्रीय वाऱ्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्याला पुढील दोन दिवस वादळी वाऱ्याचा धोका असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर कोकण आणि गोवा किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा दिला आहे.

खबरदारीचा इशारा

२७ मे च्या सुमारास पश्चिम मध्य आणि लगतच्या उत्तर बंगाल उपसागरावर आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत त्याचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

दाबोळीत सर्वाधिक ५.५९ इंच पाऊस

राज्यात मागील २४ तासांत सरासरी ९४.५ मिमी म्हणजेच ३.७२ इंच इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. राज्यात सर्वाधिक पाऊस ५.५९ इंच इतक्या पावसाची नोंद दाबोळी येथे करण्यात आली.

Goa Rain Updates

मुरगाव बंदराचे कामकाज स्थगित

उत्तर कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीवर चक्रीवादळ निर्माण झाल्यानंतर पुढील सूचना मिळेपर्यंत मुरगाव बंदर प्राधिकरण येथील बंदराचे कामकाज स्थगित केले आहे. सर्व जहाजांना खबरदारीचा उपाय म्हणून समुद्रात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बार्जेसना सुरक्षित भागात जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे उपाय मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या मानक कार्यप्रणालीनुसार आहेत.

‘त्या’ व्हिडिओमुळे संभ्रम

राज्यात मोठे चक्रीवादळ घोंघावणार आहे. अरबी समुद्रात हे चक्रीवादळ तयार होऊन गोव्याची मोठ्या प्रमाणात हानी करेल, असा संदेश देणारा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरत असल्याने लोकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे; परंतु चक्रीवादळासारखी स्थिती नाही. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही, असे गोवा वेधशाळेचे संचालक नहूष कुलकर्णी यांनी सांगितले.

पाच चारचाकींचा चुराडा

बुधवारी पणजीत झाड कोसळून तब्बल दहा दुचाकींचे नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी खोब्रावाडा-कळंगुट येथे भले मोठे आंब्याचे झाड पाच चारचाकी वाहनांवर कोसळल्याने या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

Farmagudhi to Bhoma Road: फर्मागुढी-भोम रस्ता काम होणार सुरु! मंत्री कामतांची ग्वाही; बांदोडा ‘अंडरपास’चे उद्‌घाटन

Chimbel Unity Mall: 'चिंबल' ग्रामस्थांचे मोठे यश! युनिटी मॉल बांधकाम परवान्याला दिले आव्हान; सरकारी पक्षाचा विरोध फेटाळला

SCROLL FOR NEXT